१८ वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडबरोबर लिव्ह इनमध्ये राहतो 'हा' प्रसिद्ध अभिनेता, सुपरहिट चित्रपटांत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 11:31 IST2023-09-27T11:30:08+5:302023-09-27T11:31:44+5:30

'शापित', 'एक पहेली लीला', 'ऑपरेशन परिंदे', 'आशिक' यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी काम केलं आहे.

rahul dev birthday actor love life live in relationship with 18 year younger gf mugdha godse | १८ वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडबरोबर लिव्ह इनमध्ये राहतो 'हा' प्रसिद्ध अभिनेता, सुपरहिट चित्रपटांत केलंय काम

१८ वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडबरोबर लिव्ह इनमध्ये राहतो 'हा' प्रसिद्ध अभिनेता, सुपरहिट चित्रपटांत केलंय काम

अनेक बॉलिवूड चित्रपटांत नकारात्मक भूमिका साकारुन सिनेसृष्टीत स्वत:ची खास ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे राहुल देव. बॉलिवूड व्हिलन म्हणून ओळखले जाणारे राहुल देव त्यांच्या फिटनेसमुळेही चर्चेत असतात. ५५व्या वर्षीही त्यांचा फिटनेस तरुणांना लाजवेल असाच आहे. राहुल देव यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया. 

राहुल यांचा जन्म २७ सप्टेंबर १९६८ रोजी दिल्लीत झाला. त्यांचे वडील असिस्टंट कमिशनर होते. त्यांचा भाऊ मुकुल देवही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. भावामुळेच राहुल यांनाही अभिनय क्षेत्रात रुची निर्माण झाली. 'शापित', 'एक पहेली लीला', 'ऑपरेशन परिंदे', 'आशिक' यांसारख्या चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. बॉलिवूडबरोबरच त्यांनी दाक्षिणात्य चित्रपटांतही काम केलं आहे. 

१९९८ साली राहुल यांनी रीना यांच्याशी लग्न केलं होतं. परंतु, २००९ साली कॅन्सरमुळे रीना यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या निधनाने त्यांना मोठा धक्का बसला होता. ११ वर्षाच्या मुलाचा सांभाळ कसा करायचा, हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. पत्नीच्या निधनानंतर राहुल देव एकटे पडले होते. त्याच दरम्यान त्यांची मुग्धा गोडसेबरोबर ओळख झाली. 

मुग्धा राहुल देव यांच्यापेक्षा तब्बल १८ वर्षांनी लहान आहे. २०१५मध्ये राहुल आणि मुग्धा यांनी एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली. राहुल गर्लफ्रेंड मुग्धाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. 

Web Title: rahul dev birthday actor love life live in relationship with 18 year younger gf mugdha godse