समय रैनाचं ते टी-शर्ट पाहून आर्यन आणि शाहरुख खानची काय होती पहिली रिअ‍ॅक्शन, राघव म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:59 IST2025-10-08T16:58:22+5:302025-10-08T16:59:15+5:30

समयनं परिधान केलेलं ते टीशर्ट पाहून शाहरुख खान आणि आर्यन खान यांची काय प्रतिक्रिया होती, याचा खुलासा 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील अभिनेता राघव जुयाल याने केला आहे.

Raghav Juyal Recalls How Shah Rukh Khan And Aryan Khan Reacted To Samay Raina Say No To Cruise T Shirt | समय रैनाचं ते टी-शर्ट पाहून आर्यन आणि शाहरुख खानची काय होती पहिली रिअ‍ॅक्शन, राघव म्हणाला...

समय रैनाचं ते टी-शर्ट पाहून आर्यन आणि शाहरुख खानची काय होती पहिली रिअ‍ॅक्शन, राघव म्हणाला...

प्रसिद्ध कॉमेडियन आणि यूट्यूबर समय रैना हा त्याच्या स्पष्ट आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. नुकताच तो आर्यन खानच्या 'द बड्स ऑफ बॉलिवूड' या वेबसिरीजच्या प्रीमियरला पोहचला होता. यावेळी तो अनोख्या टी-शर्टमुळे चर्चेत आला आहे. समयनं परिधान केलेल्या टी-शर्टवर 'से नो टू क्रूझ' (Say No To Cruise) असे लिहिलेले होते.  २०२१ मधील क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचं विडंबन करणार हे टी-शर्ट असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं. पण, समयनं परिधान केलेलं ते टीशर्ट पाहून शाहरुख खान आणि आर्यन खान यांची काय प्रतिक्रिया होती, याचा खुलासा 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील अभिनेता राघव जुयाल याने केला आहे.

रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवर बोलताना राघव जुयालने प्रीमियरमधील काही फोटो शेअर केले. यातील एका फोटोमध्ये समय रैना आणि त्याचा 'से नो टू क्रूझ' टी-शर्ट स्पष्ट दिसत होता. यावर बोलताना राघव म्हणाला, "समय हा टी-शर्ट घालून तिथे पोहोचला आहे आणि लोक हसत आहेत. आर्यनसुद्धा हसत आहे, सर्वजण हसत आहेत, कारण फक्त समयचं हे करू शकतो. आपण लोक ते करू शकत नाही".राघवने पुढे सांगितले की, "तो संपूर्ण पार्टीमध्ये असाच फिरत होता आणि सर्वांना टी-शर्ट दाखवत होता".


शाहरुख खानची प्रतिक्रिया
रणवीरने जेव्हा राघवला विचारले की समय रैना शाहरुख खानसमोर गेला होता का, तेव्हा राघवने सांगितले की, शाहरुख खानने या गोष्टीकडे फारसे लक्ष दिले नाही. शाहरुखची टी-शर्ट पाहून प्रतिक्रिया स्पष्ट करताना राघव म्हणाला, "त्यांच्यासाठी आम्ही सगळेच मुलांसारखे आहोत ना? ते सर्वांना मुलांप्रमाणेच प्रेमानं वागवतात". याचा अर्थ शाहरुखने या घटनेला फारसे गांभीर्याने घेतलं नाही. 

 

Web Title : समय रैना के टी-शर्ट पर आर्यन और शाहरुख की प्रतिक्रिया

Web Summary : आर्यन खान के कार्यक्रम में समय रैना की 'से नो टू क्रूज़' टी-शर्ट पर प्रतिक्रिया हुई। राघव जुयाल ने बताया कि आर्यन सहित सभी हँसे। शाहरुख को इससे कोई फर्क नहीं पड़ा, उन्होंने समय को परिवार की तरह माना।

Web Title : Aryan & SRK's reaction to Samay Raina's 'Cruise' T-shirt.

Web Summary : Comedian Samay Raina's 'Say No To Cruise' T-shirt at Aryan Khan's event sparked reactions. Raghav Juyal revealed everyone, including Aryan, laughed. SRK seemingly didn't mind it, treating Samay like family.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.