मेहुण्यासाठी पुढे आली प्रियंका चोप्रा, राघव चड्ढांच्या 'त्या' भावनिक व्हिडीओवर कमेंट करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 14:58 IST2026-04-05T14:39:21+5:302026-04-05T14:58:25+5:30
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचे पती राघव चड्ढा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.

मेहुण्यासाठी पुढे आली प्रियंका चोप्रा, राघव चड्ढांच्या 'त्या' भावनिक व्हिडीओवर कमेंट करत म्हणाली...
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचे पती राघव चड्ढा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राघव चड्ढा आणि आम आदमी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप, वार-पलटवार सुरू आहेत. राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवण्यात आलंय. पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून विनंती केली आहे की, भविष्यात त्यांना पक्षाच्या कोट्यातून बोलण्यासाठी वेळ दिला जाऊ नये. यातच राघव यांना त्यांची मेहुणी अर्थात ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा हिचा पाठिंबा मिळाल्याचे दिसते आहे.
नुकतंच राघव चड्ढा यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. "मला गप्प बसवण्यात आलं आहे, पण मी हरलेलो नाही" असं त्यांनी ठामपणे म्हटलं. या व्हिडीओमध्ये त्यांनी संसदेत मांडलेल्या विविध मुद्द्यांची झलक दाखवली. शिक्षण-रोजगारातील अंतर, 'वन नेशन-वन मेडिकल ट्रीटमेंट', वेतन निर्देशांक असो वा क्रांतिकारक भगत सिंग यांना भारतरत्न देण्याची मागणी असो, अशे मुद्दे त्यांनी मांडले होते. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये राघव यांनी फक्त भारतीय ध्वजाचा इमोजी पोस्ट केला होता. यावर प्रियंका चोप्रा हिने हार्ट, टाळ्या आणि क्लॅप इमोजी कमेंट करत त्यांना समर्थन दर्शवलं.
प्रियंकाचं कमबॅक
प्रियंका चोप्रा लवकरच भारतीय पडद्यावर परतणार आहे. दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या 'वाराणसी' या भव्य चित्रपटातून ती कमबॅक करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.