राधिका म्हणाली, तर... स्वत:लाच आरशात पहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2016 19:57 IST2016-10-05T14:27:12+5:302016-10-05T19:57:12+5:30

राधिका आपटे आणि काँट्राव्हर्सी यांचे नातेच तयार झाल्याचे दिसते. ‘पार्च्श्ड’मधील न्यूड दृष्यसंबधी वार्ताहराने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राधिका आपटेचा ...

Radhika said, then ... see yourself in the mirror ... | राधिका म्हणाली, तर... स्वत:लाच आरशात पहा...

राधिका म्हणाली, तर... स्वत:लाच आरशात पहा...

ong>राधिका आपटे आणि काँट्राव्हर्सी यांचे नातेच तयार झाल्याचे दिसते. ‘पार्च्श्ड’मधील न्यूड दृष्यसंबधी वार्ताहराने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राधिका आपटेचा राग अनावर झाला. तिने रागाच्या भरात न्यूड पाहायची हौस असेल तर स्वत:लाचा आरशात पाहण्याचा सल्ला दिला. तिच्या या वक्तव्यामुळे ती पुन्हा एकादा चर्चेत आली आहे. 

एका कार्यक्रमादरम्यान तिला चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी काँट्रोव्हर्सी निर्माण करण्याची गरज होती का? असा प्रश्न विचाराला. हे ऐकताच तिचा पारा भडकला. ती म्हणाली, ‘‘माफ करा. पण, तुमचा हा प्रश्न विचित्र आहे. तुमच्या सारख्या लोकांमुळे काँटोव्हर्सी निर्माण होते. तुम्ही क्लिप पाहिली, शेअर केली आणि काँटोव्हर्सी निर्माण केली. मी एक कलाकार आहे. मी माझे काम प्रामाणिकपणे करीत आहे, जागतिक सिनेमाकडे पहा, तिकडे काय सुरू आहे. परदेशात लोक कसे काम करतात. तेथील सिनेमात असलेल्या अशा दृष्यांबद्दल तुम्ही असे प्रश्न का करीत नाही’’.

पार्श्च्ड या चित्रपटात राधिका व आदील हुसैन यांच्यात शूट करण्यात आलेल्या इंटिमेट दृष्यांची चांगलीच चर्चा झाली होती. चित्रपट समीक्षकांनी पार्श्च्डची प्रसंशा केली आहे. केवळ इंटिमेट सिन्समुळे नव्हे तर चांगला चित्रपट म्हणून याकडे पाहण्यात यावे असा प्रयत्न पार्श्च्डमधील सर्व कलावंत करीत आहे. असे होत असतानाच काँटोव्हर्सीचा मुद्दा उपस्थित केल्याने राधिकाचा पारा तापला असावा. 

‘‘जे लोक स्वत:च्या शरीराकडे पाहून दुखी असतात तेच दुसºयाचे शरीर पाहण्यासाठी उत्सुक असतात, जर तुम्हाला उद्या एखाद्याचे नग्न शरीर पहायचे असेल तर स्वत: आरशासमोर जाऊन उभे राहा’’ असेही राधिकाने ठणकावून सांगितले. तिचे हे रूप पाहून उपस्थिताना आश्चर्याचा धक्काच बसला असेल. 

Web Title: Radhika said, then ... see yourself in the mirror ...