शाहरुख खानला 'अंकल' म्हणाली अंबानींची होणारी सून; राधिका मर्चंटचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 12:47 IST2024-03-08T12:46:58+5:302024-03-08T12:47:32+5:30

अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एका व्हिडिओत राधिका मर्चंट किंग खानला अंकल म्हणताना दिसत आहे. 

radhika merchant called shah rukh khan uncle anant ambani pre wedding video viral | शाहरुख खानला 'अंकल' म्हणाली अंबानींची होणारी सून; राधिका मर्चंटचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

शाहरुख खानला 'अंकल' म्हणाली अंबानींची होणारी सून; राधिका मर्चंटचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. १ ते ३ मार्चदरम्यान गुजरातमधील जामनगर येथे अनंत-राधिकाचा प्री वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड, हॉलिवूडमधील सेलिब्रिटींसह अनेक दिग्गजांनीही हजेरी लावली होती. अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एका व्हिडिओत राधिका मर्चंट किंग खानला अंकल म्हणताना दिसत आहे. 

अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्याला शाहरुख खान त्याच्या कुटुंबीयांसह उपस्थित होता. या सोहळ्यात तिन्ही खानने त्यांच्या खास परफॉर्मन्सने चार चांद लावले. आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान पहिल्यांदाच एकत्र थिरकताना दिसले. अंबानींच्या सोहळ्यातील हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. आता या सोहळ्यातील आणखी एका व्हिडिओ लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओत राधिका मर्चंट, अनंत अंबानी आणि शाहरुख खान स्टेजवर दिसत आहेत. 

या व्हिडिओत राधिका अनंत अंबानीसाठी शाहरुखच्या सिनेमाचा डायलॉग म्हणते. त्याबरोबरच अंबानींची होणारी सून किंग खानचा अंकल म्हणून उल्लेख करते. राधिका म्हणते, "शाहरुख अंकल आज मी तुमच्या सिनेमाचा एक डायलॉग म्हणणार आहे. इतनी शिद्दत से मैने तुम्हें पाने की कोशिश की है, की हर झर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है". राधिकाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. "शाहरुख अंकल?" असं म्हणत एकाने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. "फक्त राधिकाच शाहरुखला अंकल म्हणू शकते", "अंकल बोलली मनाला शांती मिळाली" अशा कमेंट्सही राधिकाच्या या व्हिडिओवर केल्या आहेत. 

दरम्यान, राधिका आणि अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्याची संपूर्ण देशभर चर्चा रंगली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी साखरपुडा केला होता. आता जुलै महिन्यात ते दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. 

Web Title: radhika merchant called shah rukh khan uncle anant ambani pre wedding video viral