राधिका आपटेचे इंस्टाग्रामवरील लेटेस्ट फोटो आले चर्चेत, फोटो पाहून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 12:22 IST2021-02-10T12:21:57+5:302021-02-10T12:22:22+5:30

राधिका आपटेचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Radhika Apte's latest photo on Instagram came up in the discussion, fans were shocked to see the photo | राधिका आपटेचे इंस्टाग्रामवरील लेटेस्ट फोटो आले चर्चेत, फोटो पाहून चाहते झाले हैराण

राधिका आपटेचे इंस्टाग्रामवरील लेटेस्ट फोटो आले चर्चेत, फोटो पाहून चाहते झाले हैराण

अभिनेत्री राधिका आपटे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती बऱ्याचदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूप त्रस्त, बिकट अवस्थेत दिसते आहे. तसेच तिच्या हातात गनदेखील पहायला मिळते आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे की राधिका इतकी हैराण का आहे. हा तिची आगामी सीरिज घोलच्या दुसऱ्या सीझनचा लूक आहे. तिचा हा लूक खूप जबरदस्त वाटतो आहे.

राधिका आपटेचा घोल या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये राधिका आपटे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक प्रीतम ग्राहमने आपल्या या सीरिजबद्दल बोलताना आधीच हिंट दिली होती आणि राधिका आपटेच्या या लूकमुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. राधिकाचा हा लूक खूप स्टनिंग वाटतो आहे.


राधिका आपटेच्या या फोटोत ती मातीने रंगलेली दिसते आहे. तिच्या हातात बंदुक आहे. तिचा हा लूक पाहून समजते आहे की ती कोणत्या तरी सीक्रेट मिशनवर आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, द फॅब्युलस. 


 राधिका आपटेची वेबसीरिज घोलचा पहिला सीझन प्रेक्षकांना फार भावला नव्हता. मात्र ज्यांना हॉरर सिनेमे पहायला आवडतात त्यांना ही सीरीज खूप भावली होती. प्रीतम ग्राहमने अरबी पौराणिक कथांपासून प्रेरीत होऊन घोलचे दिग्दर्शन कले होते. २०१८ साली रिलीज झालेल्या वेबसीरिजमध्ये राधिका आपटे आणि मानव कौल मुख्य भूमिकेत होते. आता राधिकाचे हे फोटो पाहून हे स्पष्ट झाले आहे की या सीरिजचा दुसरा सीझन लवकरच येणार आहे. 

Web Title: Radhika Apte's latest photo on Instagram came up in the discussion, fans were shocked to see the photo