रस्त्यावर बेडूक बनून बसली राधिका आपटे; फोटो पाहून युजर्स म्हणाले, पॅन्ट कुठे गेली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 11:36 IST2021-07-27T11:10:21+5:302021-07-27T11:36:11+5:30

राधिका आपटे ही बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री. चित्रपटांसोबतच लुक्समुळेही ती चर्चेत असते. सध्या चर्चा होतेय ती तिच्या एका ग्लॅमरस फोटोची.

radhika apte shares photo in glamorous look users trolled | रस्त्यावर बेडूक बनून बसली राधिका आपटे; फोटो पाहून युजर्स म्हणाले, पॅन्ट कुठे गेली?

रस्त्यावर बेडूक बनून बसली राधिका आपटे; फोटो पाहून युजर्स म्हणाले, पॅन्ट कुठे गेली?

ठळक मुद्देपायात स्लीपर आणि पिंक कलरचा ओपन शर्ट असा राधिकाचा हा लुक काही जणांना जाम आवडला आहे. पण काहींनी यावरून तिला ट्रोलही केले.

राधिका आपटे (Radhika apte) ही बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री. चित्रपटांसोबतच लुक्समुळेही ती चर्चेत असते. सध्या चर्चा होतेय ती तिच्या एका ग्लॅमरस फोटोची. राधिकाने सोशल मीडियावर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. यात राधिका अनोख्या अंदाजात दिसतेय. फोटोत ती चक्क रस्त्यावर हात पसरून बसलेली दिसतेय. तिच्या शेजारी बेडकाचा एक स्टॅच्यू आहे आणि या स्टॅच्यूशेजारी बसून राधिकाने बेडकासारखीच पोज दिली आहे. ‘ प्रत्येकजण प्राणी आहे. मी बेडकासारखी दिसतेय...’असे तिने हा फोटो शेअर करताना लिहिलेय.

अनेकांना राधिकाचा हा फ्रॉग लूक खूप आवडला आहे. काही जणांनी तिला सुंदर आणि सेक्सी बेडूक म्हटलं आहे.  राधिकाने आपण कोणत्या प्राण्यासारखं दिसतो हे सांगितल्यानंतर चाहत्यांनाही तुम्ही कुणासारखे दिसता असा प्रश्न केला आहे. यावर अनेकांनी आम्ही पण तुझ्यासारखेच बेडूक असल्याचं म्हटलं आहे.

झाली ट्रोल


पायात स्लीपर आणि पिंक कलरचा ओपन शर्ट असा राधिकाचा हा लुक काही जणांना जाम आवडला आहे. पण काहींनी यावरून तिला ट्रोलही केले. भीक मांग रही हो क्या बेबी, तुम्हारी पँट कहां है, अशा आशयाच्या कमेंट्स करत अनेकांनी तिची खिल्ली उडवली. चित्रपट असोत, वा वेब सीरिज राधिका आपटेचं  नाव आघाडीवर घेतलं जातं. तिच्या दमदार अभिनयामुळे देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने स्वत:ला सिद्ध करुन दाखवलं आहे. रिल लाइफमध्ये जशी राधिका बोल्ड दिसते तशीच रिअल लाइफमध्येही ती बिनधास्त आहे. राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी आणि तमीळ सिनेमातही काम केलं आहे. तसेच अनेक वेबसिरिजमध्ये देखील ती झळकली आहे.

Web Title: radhika apte shares photo in glamorous look users trolled