"फिल्म इंडस्ट्री आईंसाठी अजूनही अनुकूल नाही" राधिका आपटे स्पष्टच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:40 IST2025-06-02T11:29:10+5:302025-06-02T11:40:30+5:30

राधिका आपटे हिनं आई झाल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीत काम करताना येणाऱ्या अडचणींवर भाष्य केलं. 

Radhika Apte Expresses Challenges For New Mothers In Film Industry | "फिल्म इंडस्ट्री आईंसाठी अजूनही अनुकूल नाही" राधिका आपटे स्पष्टच बोलली

"फिल्म इंडस्ट्री आईंसाठी अजूनही अनुकूल नाही" राधिका आपटे स्पष्टच बोलली

फिल्म इंडस्ट्रीत ग्लॅमर असलं तरी महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. विशेषतः मातृत्व स्वीकारल्यानंतर अभिनेत्रींसमोर करिअर टिकवणं, संधी मिळवणं हे मोठं आव्हान ठरतं. इंडस्ट्रीत अजूनही नव्यानं आई झालेल्या अभिनेत्रींना आवश्यक तेवढं समजून घेतलं जात नाही, असं बोललं जातं. अनेक अभिनेत्रींनी वेळोवेळी या विषयावर आपली मतं मांडली आहेत. अशातच अभिनेत्री राधिका आपटे हिनं आई झाल्यानंतर फिल्म इंडस्ट्रीत काम करताना येणाऱ्या अडचणींवर भाष्य केलं. 

राधिकाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिच्या मुलीला जन्म दिलाय. तेव्हापासून राधिका आईच्या जबाबदाऱ्या आणि तिच्या व्यावसायिक कामाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतेय. इंडियन एक्सप्रेस स्क्रीनशी बोलताना राधिका आपटेला चित्रपट उद्योग नवीन मातांच्या गरजांसाठी अनुकूल आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. तर उत्तरात राधिका म्हणते, "भारतीय चित्रपटसृष्टीत आई झालेल्या महिलांना फारसा आधार मिळत नाही". तिने स्पष्ट केलं की, प्रसूतीनंतर लगेच कामावर परतणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. तिने हेही कबूल केलं की आता पुढे या जबाबदाऱ्या आणि करिअर यांचा समतोल कसा साधायचा हे तिलाही कळत नाहीये.

ती म्हणाली, "चित्रपट उद्योगात काम करणे खरोखर कठीण आहे. कारण आपण चित्रपट बनवण्यात बराच वेळ घालवतो आणि आपण ज्या पद्धतीने काम करतो ते देखील खूप कठीण आहे. तसेच, आपल्याला बाळाला पाहण्याची संधी मिळत नाही. मलाही आता मार्ग शोधून काढावा लागेल". राधिकाच्या कामबद्दल बोलायचं झालं तर तिचा 'सिस्टर मिडनाईट' चित्रपट ३० मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

आई झाल्यानंतर दीपिकाच्या हातून निसटला चित्रपट

अलिकडेच बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिला 'स्पिरीट' सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दीपिका लेकीच्या संगोपनात व्यग्र असल्यानं दीपिकानं दिवसातले आठ तासच शूटिंग करणार असल्याचं 'स्पिरीट' सिनेमाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना सांगितलं होतं. पण, तिचा हाच निर्णय संदीप रेड्डी वांगा यांना  पटला नाही आणि तिला सिनेमातून काढण्यात आलं. 

Web Title: Radhika Apte Expresses Challenges For New Mothers In Film Industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.