रेस अगेन्सट टाईम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 10:56 IST2016-06-17T05:26:20+5:302016-06-17T10:56:20+5:30

भविष्यात कल्पना चावला बनायचंय. तिच्यासारखं अंतराळात जायची इच्छा होती. रियल लाइफमध्ये नाही जमलं ते रिल लाइफममध्ये करायचंय अशी इच्छा ...

Race Agent Time! | रेस अगेन्सट टाईम !

रेस अगेन्सट टाईम !

class="adn ads" style="padding-bottom: 20px; border-left-width: 1px; border-left-style: solid; border-left-color: transparent; padding-left: 4px; color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: medium; line-height: normal;">
भविष्यात कल्पना चावला बनायचंय. तिच्यासारखं अंतराळात जायची इच्छा होती. रियल लाइफमध्ये नाही जमलं ते रिल लाइफममध्ये करायचंय अशी इच्छा व्यक्त केलीय अभिनेत्री संदीपा धार हिनं. इसी लाइफ में सिनेमातून बॉलीवुडमध्ये एंट्री मारणा-या संदीपाचा '7 hours to go' हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. याच निमित्ताने सिएनक्सने संदीपाशी  साधलेला हा संवाद.
 
'7 hours to go' हा नावावरुनच सस्पेन्स सिनेमा वाटतोय. तर या सिनेमाविषयी आणि तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील ?
 
'7 hours to go'  हा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमात मी एक महिला पोलीस अधिकारी साकारताना पाहायला मिळेल. 7 जणांचं शिव पंडित अपहरण करतो. सात तासात त्याच्या काही मागण्या आहेत ज्या पूर्ण नाही केल्या तर तो दर तासाला एकेका व्यक्तीला मारणार अशी त्यानं धमकी दिलेली असते. त्याचं असं करण्यामागं काय कारण आहे, पुढे काय होतं, हे रहस्यमयीरित्या उलगडणारा असा हा सिनेमा आहे.
 
या सिनेमात तू खूप वेगळी भूमिका साकारलीय ती म्हणजे पोलिसाची तर तुझ्यासाठी ते किती आव्हानात्मक होतं ?
 
या सिनेमासाठी मी बरीच तयारी केलीय. सामान्य भूमिका साकारणं सहज शक्य होतं. मात्र ज्या व्यक्तींशी तुमचा कधीही आमनासामना झालेला नसतो. त्यांच्या संदर्भातल्या भूमिका साकारणं कठीण असतं. वास्तविक जीवनात माझा आणि पोलिसांचा कधी संबंध आलाच नव्हता.. त्यात यांत माझी भूमिका महिला पोलीस अधिका-याची. म्हणजे खूप काही एक्शन.. मात्र मला एक्शनचा ए सुद्धा माहित नव्हता.. त्यामुळं हा सिनेमा म्हणजे माझ्यासाठी शून्यापासून सुरुवात होती. पोलीसांचं जीवन कसं असतं हेसुद्धा मला माहित नव्हतं.. त्यासाठी मी रियल लाइफ पोलीस अधिकारी ज्योती राणे ज्या ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, त्यांच्याकडून पोलिसांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.. त्यांच्यासोबत वावरताना पोलिसांचं जीवन कसं असतं याची प्रचिती मला आली. त्यांच्यासह खाणं पिणं, वीकेंडला वेळ घालवणं अशा सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवल्या..
 
पोलिसांचं आयुष्य अनुभवताना तुला कोणत्या खास गोष्टी जाणवल्या ?
 
ज्योती राणे यांच्यासह घालवलेल्या वेळामुळं पोलिसांचं रिल लाइफमध्ये दाखवलं जाणारं रुप किती वेगळं असतं हे कळलं. ब-याचदा सिनेमात एक्स्ट्रा स्टंट, सुपरपॉवर वगैरे पद्धतीने पोलीस दाखवले जातात एकटा पोलीस दहा-दहा जणांना मारतो असंही दाखवलं जातं.. मात्र ज्योती यांच्यासोबत वावरल्यानं पोलीससुद्धा एक माणूसच असतो हे उमगलं. त्यांची जीवनपद्धती घरी आणि कामावर ब-याच अंशी सारखी असते. फक्त एकदा खाकी गणवेश अंगावर चढला की काही तरी देशासाठी करण्याची भावना आपसुकच अंगात भिनते.. पूर्ण बॉडी लँग्वेज बदलून जाते.. त्या खाकीत काही वेगळीच ताकद असते.. त्याला काय म्हणावं देशभक्ती की आणखी काही कळत नाही.
 
पोलीसाची भूमिका साकारणं म्हणजे मोठं आव्हान तर ही भूमिका साकारताना किंवा स्टंट करतानाचा एखादा किस्सा ?
 
पोलिसाची भूमिका साकारताना खूप एन्जॉय केलं.अशाप्रकारची भूमिका कधीही साकारली नव्हती. त्यामुळं एक वेगळा आत्मविश्वास मिळाला. नवा ऍटिट्यूड आला. या भूमिकेसाठी खास मार्शल आर्टचं ट्रेनिंग घेतलं. दीड महिने रफ एंड टफ खडतर असं ट्रेनिंग घेतलं. उन्हात एक्शन सीन करणं खूप कठीण गेले. ब-याचदा दुखापतीही झाल्या. मात्र त्यातून आणखी कणखर बनत गेले. एकदा असंच उन्हात रिक्षावरुन उडी मारण्याचा सीन होता. हा सीन करताना बरीच मेहनत घ्यावी लागली. कधी उडी चुकायची तर कधी दुस-या कुणाचं टायमिंग चुकायचं. काही ना काही अडचण यायची. मात्र सीन परफेक्ट होईपर्यंत आमच्या एक्शन दिग्दर्शकानं थारा घेतला नाही. अखेर तो सीन यशस्वीरित्या पूर्ण केला. तोच सीन सध्या सिनेमाच्या ट्रेलरमध्येही पाहायला मिळतो. हा सीन त्या आठवणी ताज्या होतात.. मुंबईतल्या भेंडीबाजार, वर्सोवा अशा गर्दीच्या ठिकाणी केलेल्या शूटिंगचा अनुभवही खास होता.
 
या सिनेमानं तुझ्यात काय बदल घडून आलाय ?
 आधी मला रोमँटिक भूमिका जास्त ऑफर व्हायच्या.. मात्र दिग्दर्शक सौरभ वर्मानं या सिनेमाचा कथा ऐकवली तेव्हा पहिला प्रश्न की मला कुणी कसं काय पोलिसाची भूमिका देऊ शकतो. मात्र ते त्याचं व्हिजन होतं. त्यामुळं मीसुद्धा एक चॅलेंज म्हणून ती भूमिका स्वीकारली. आता ही भूमिका साकारल्यानंतर एक्शनबद्दल मला खास आकर्षण वाटू लागलंय. एक्शन, थ्रिलर सिनेमांचं जणू चस्का लागलाय.
 
दबंग खानसोबत कामाचा अनुभव कसा होता ?
 दबंग खान सलमानसोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय असाच होता. सलमाननं साकारलेली पोलिसाची भूमिका मलाही कधी साकारण्यास मिळेल असा विचारही केला नव्हता.. जर माहिती असतं तर दबंग 2 वेळी सलमानकडून काही खास टीप्स घेतल्या असत्या. सलमान खरंच खूप प्रेमळ आणि मदतीला धावणारा आहे. तो खरंच अमेझिंग आहे.. सलमान आणि अरबाजसह काम करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजते..
 
तुझ्यासाठी सिनेमाची कथा महत्त्वाची की भूमिका ?
 
सिनेमा स्वीकारताना कधीही मी च़ॉईस ठेवत नाही.. सिनेमा कुठल्या पठडीतला, भूमिका कशी हे माझ्यासाठी महत्त्वाचं नसतं. मला फक्त त्या सिनेमाची स्क्रीप्ट कशी आहे हे महत्त्वाचं वाटतं.. एक्शन सिनेमा तर आवडतात.. शिवाय थ्रिलर, रोमँटिक आणि कॉमेडी सिनेमा करायला आवडतील. सिनेमांमध्ये आता महिलाप्रधान सिनेमा बनतायत हेसुद्धा चांगलं लक्षण म्हणावं लागेल.  
 
 
सध्या बायोपिकचा ट्रेंड आहे तर तुला कोणाच्या जीवनावरील सिनेमात भूमिका करायला आवडेल ?
 
सध्या बायोपिक बनतायत हा चांगला ट्रेंड आहे. ग्रेट व्यक्तींचा जीवनप्रवास उलगडला जातोय, त्यातून समाजाला काही तरी शिकण्यासारखंच आहे. मला तर कल्पना चावला साकारायला आवडेल. कारण बालपणापासूनच माझी अंतराळवीर बनण्याची इच्छा होती. कल्पनासारखं अंतराळात जावं असं वाटायचं, त्यामुळं तिची भूमिका साकारण्याचं माझं स्वप्न आहे.
 
हा सिनेमा रसिकांनी का पाहावा ?

 '7 hours to go'  हा सिनेमा रसिकांचं मनोरंजन करणारा सिनेमा आहे. यांत सर्व काही आहे. एक्शन, थ्रिलर, सस्पेन्स, रोमान्स, कॉमेडी सारं काही आहे.. त्यामुळं एक चांगला सिनेमा पाहायचा असेल तर हा सिनेमा आवर्जून पाहा.
 
 
Attachments area
 
 
 
 
 

Web Title: Race Agent Time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.