RACE-3 : नव्या पोस्टरमध्ये दिसला सलमान खान-जॅकलीन फर्नांडिसचा रोमॅण्टिक अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 21:23 IST2018-04-27T15:53:47+5:302018-04-27T21:23:47+5:30
सलमान खानच्या आगामी ‘रेस-३’ या चित्रपटाचे नवे पोस्टर समोर आले असून, त्यामध्ये त्याचा अन् जॅकलीनचा रोमॅण्टिक अंदाज बघावयास मिळत आहे.

RACE-3 : नव्या पोस्टरमध्ये दिसला सलमान खान-जॅकलीन फर्नांडिसचा रोमॅण्टिक अंदाज!
ब लिवूडचा दबंग सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘रेस-३’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शुक्रवारी या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये सलमान खानच्या मिठीत जॅकलीन फर्नांडिस बघावयास मिळत आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या हातात बंदूकही दिसत आहे. दोघांचा हा रोमॅण्टिक अंदाज चाहत्यांकडून प्रचंड पसंत केला जात आहे. दरम्यान, सलमान खान ‘रेस-३’ च्या शूटिंगसाठी आपल्या संपूर्ण टीमसह काश्मीरचे निसर्गरम्य वातावरण अनुभवत आहे.
">http://
एकीकडे काश्मीरमधील थंडीमुळे कलाकार त्रस्त झाले असताना, दबंग सलमान खानवर मात्र थंडीचा कुठलाही परिणाम होत नसताना दिसत आहे. दरम्यान, सध्या चित्रपटातील काही अॅक्शन दृश्यांची शूटिंग केली जात आहे. त्यासाठी चित्रपटातील सर्वच पात्र आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी अथक प्रयत्न करताना दिसत आहेत. या चित्रपटात सलमान, जॅकलीनसह अनिल कपूर, डेजी शाह, बॉबी देओल आणि साकिब सलीम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजा करीत आहे.
![]()
‘रेस-३’ १५ जून रोजी ईदनिमित्त प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट रेस फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. याअगोदरच्या दोन भागांमध्ये सैफ अली खान आपल्या अॅक्शन अंदाजात बघावयास मिळाला. मात्र तिसºया भागात सर्वच स्टारकास्ट बदलली गेल्याने चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता लागली आहे. दरम्यान, आतापर्यंत सर्वच स्टारचा चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे.