मनालीतल्या घरात क्वीन कंगन राणौतने केला गृह प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 15:47 IST2018-03-16T10:17:14+5:302018-03-16T15:47:14+5:30

'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'मध्ये व्यस्त असलेल्या कंगना राणौतवरतने नुकतेच तिच्या मनालीमधल्या अलिशान बंगल्यामध्ये गृह प्रवेश केला आहे. ...

Queen Bracelet has made a home in Manaliya house | मनालीतल्या घरात क्वीन कंगन राणौतने केला गृह प्रवेश

मनालीतल्या घरात क्वीन कंगन राणौतने केला गृह प्रवेश

'
;मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'मध्ये व्यस्त असलेल्या कंगना राणौतवरतने नुकतेच तिच्या मनालीमधल्या अलिशान बंगल्यामध्ये गृह प्रवेश केला आहे. कंगनाच्या या नव्या बंगल्यात बुधवारी गृह प्रवेशाची पूजा ठेवण्यात आली होती. ज्यावेळी कंगनाचे संपूर्ण कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता. असे कळते आहे की या बंगल्यासाठी कंगाने मोठी रक्कम मोजली आहे. 
  डीएनएच्या रिपोर्टनुसार कंगनाने हा बंगला 30 कोटींना खरेदी केला आहे. मनालीसारख्या सुंदर शहरात असलेल्या या बंगल्यात सर्व आधुनिक सुख-सुविधा आहे. कंगनाने आपल्या फॅन्ससोबत गृह प्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कंगना कार्तिकस्वामींची भक्त आहे त्यामुळे गृह प्रवेशाच्या वेळी तिने ‘कार्तिकेय निवास’ ठेवले होते. 
  बॉलिवूडची क्वीन कंगना राणौतने हा बंगला 'क्वीन'च्या यशानंतर खरेदी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंगनाने बंगल्यासाठीची जागा 10 कोटींना विकत घेतली आणि 20 कोटी बंगला बांधण्यासाठी तिने खर्च केले. या बंगल्याचे बांधकाम सुरु असताना कंगना वेळोवेळी हे पाहण्यासाठी यायची. या बंगल्यात सुमारे 8 बेडरुम्स आहे ज्याला बालकनी आहेत. या बंगल्यात डायनिंग रूम, जिम आणि योगा रुमचा समावेश आहे. 
   
ALSO READ :  कंगना राणौतने अचानक घेतला मोठा निर्णय! हृतिक रोशनलाही बसेल धक्का!!

मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपट कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे.  काही दिवसांपूर्वी कंगनाचे सेटवरचे फोटो लीक झाले होते. ‘बाहुबली’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारख्या चित्रपटांची कथा लिहिणारे विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. ती याचित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री घेते आहे.  अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट आलेली नाही. आधी हा चित्रपट यावर्षी एप्रिलमध्ये येणार, अशी खबर होती. पण मध्यंतरी या ऐतिहासिक चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची खबर आली. 

Web Title: Queen Bracelet has made a home in Manaliya house