ज्या पान मसाला जाहिराती करून बॉलिवूड स्टार कमवताहेत कोट्यावधी, अल्लू अर्जुनने टाळलं ते काम; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 02:20 PM2022-04-20T14:20:01+5:302022-04-20T18:49:23+5:30

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर आता भारतीय चित्रपटसृष्टीतील टॉप स्टार बनला आहे.

Puspha star allu arjun turned down tobacco commercial despite offered heavy fee | ज्या पान मसाला जाहिराती करून बॉलिवूड स्टार कमवताहेत कोट्यावधी, अल्लू अर्जुनने टाळलं ते काम; कारण...

ज्या पान मसाला जाहिराती करून बॉलिवूड स्टार कमवताहेत कोट्यावधी, अल्लू अर्जुनने टाळलं ते काम; कारण...

googlenewsNext

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाच्या ब्लॉकबस्टर यशानंतर आता भारतीय चित्रपटसृष्टीतील टॉप स्टार बनला आहे. मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्याला एका पान मसाला कंपनीकडून जाहिरातीसाठी मोठी रक्कम मिळाली होती, परंतु अभिनेत्याने ती नाकारली. अल्लू अर्जुन वैयक्तिकरित्या तंबाखूचे सेवन करत नसल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी ही जाहिरात पाहून तंबाखूचं सेवनं करावं असे त्याला वाटत नाही.

अल्लू अर्जुन झाडे लावण्यासारख्या सवयींचे समर्थन करत आहे, ज्याचा व्यक्ती आणि पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो.
अल्लू अर्जुनच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की चित्रपटांमध्ये धूम्रपान करणे अभिनेत्याच्या हातात नाही, त्याला जेव्हा शक्य झालेय तेव्हा त्याने याचा विरोध केला आहे. 

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हे नवीन आहे. एकीकडे तेलुगू कलाकारांसह टॉपचे अभिनेते भरमसाठ रक्कम मोजून उत्पादनाची जाहिरात करायला मागेपुढे पाहत नाहीत. दुसरीकडे, अल्लू अर्जुनसारखा अभिनेता केवळ पैशांचा विचार करत नाही. तर तो समाज कल्याण आणि चाहत्यांचा देखील विचार करतो.  अल्लू अर्जुनने तंबाखूची जाहिरात नाकारल्याचे कळताच लोक अभिनेत्याचे कौतुक करताना थकत नाहीत. अल्लू अर्जुनच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर, त्याच्या शेवटच्या रिलीज झालेल्या पुष्पाने बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई केली.  चाहते आता पुष्पाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत. पुष्पा नंतर साऊथ सुपरस्टारचे आणखी चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. 
 

Web Title: Puspha star allu arjun turned down tobacco commercial despite offered heavy fee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.