अर्शद करतोय रहस्याचा पाठलाग : ‘इरादा’चे टायटल साँग रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 17:40 IST2017-02-14T12:10:42+5:302017-02-14T17:40:42+5:30
एका गुन्हाचा पाठलाग करणारा अर्शद व नसिरुद्दीन शहा यांचे गुढ व्यक्तीमत्त्व या गाण्यातून दाखविण्यात आले आहे.
.jpg)
अर्शद करतोय रहस्याचा पाठलाग : ‘इरादा’चे टायटल साँग रिलीज
अ िनेता नसिरुद्दीन शहा व अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘इरादा’ हा चित्रपट या आठवड्यात रिलीज होत असतानाच या चित्रपटातील ‘मैने कर लिया इरादा’ हे टायटल साँग रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यातून इरादाचे कथानक सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाणे पाहिल्यावर अर्शद वारसी सेवानिवृत्त सैन्य अधिकाºयाचा पाठलाग करताना दिसतो आहे.
इरादा या चित्रपटाचे कथानक उलगडणारे ‘मैने कर लिया इरादा’ हे गाणे गायक निखिल उजगारे याने गायले असून नीरज श्रीधर यांने संगीतबद्ध केले आहे. या गाण्याची शब्दरचना समीर अंजान यांनी केली आहे. एका गुन्हाचा पाठलाग करणारा अर्शद व नसिरुद्दीन शहा यांचे गुढ व्यक्तीमत्त्व या गाण्यातून दाखविण्यात आले आहे. ‘मैने कर लिया इरादा’ या गाण्याचे संगीत रहस्याची उत्सुकता वाढविणारे आहे.
![]()
अपर्णा सिंह दिग्दर्शित या चित्रपटात अर्शद एका पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत आहे. तर नसीरूद्दीन शहा लेफ्टनंट कर्नल प्रभजीत वालियाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. एका रहस्यमयी बॉम्बस्फोटाचा तपास करताना तो यात दिसणार आहे. खरे तर ‘इरादा’ हा चित्रपट एका गंभीर मुद्यावर आधारित आहे. पण या थ्रीलर ड्रामामध्ये कॉमेडीही आहे. ‘इरादा’ हा चित्रपट आधी १० फेब्रुवारीला रिलीज होणार होता. असे झाले असते तर अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी2’सोबत या चित्रपटाची बॉक्सआॅफिस फाईट रंगली असती. ‘इरादा’ची रिलीज डेट अचानक पुढे ढकलली. आता हा चित्रपट १७ फेब्रुवारीला चित्रपटगृहांत झळकणार आहे. अर्शद व नसीरूद्दीन यांच्याशिवाय दिव्या दत्ता, सागरिका घाटगे आणि शरद केळकर यांच्याही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.