​पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाने पोस्ट केला असा फोटो की भडकले युजर्स!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 14:50 IST2018-02-08T09:20:13+5:302018-02-08T14:50:13+5:30

सोशल मीडियावरची गर्दी वाढतेय आणि या गर्दीत ट्रोल होणारे व ट्रोल करणारेही वाढलेत. ट्रोल होणा-यांमध्ये ताजा क्रमांक आहे, पंजाबी ...

Punjabi actress Sonam Bajwa posted a photo that provoked the user! | ​पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाने पोस्ट केला असा फोटो की भडकले युजर्स!!

​पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाने पोस्ट केला असा फोटो की भडकले युजर्स!!

शल मीडियावरची गर्दी वाढतेय आणि या गर्दीत ट्रोल होणारे व ट्रोल करणारेही वाढलेत. ट्रोल होणा-यांमध्ये ताजा क्रमांक आहे, पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा हिचा. सोनम ही पंजाबी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. सोनम सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव असते. चाहत्यांसाठी स्वत:चे रोज नवे फोटो शेअर करणे  तिचे आवडते काम. चाहत्यांना खूश करण्यासाठी सोनमने अलीकडे आपला एक फोटो शेअर केला. पण या फोटोने खूश होण्याऐवजी चाहते चांगलेच भडकले अन् सोनम ट्रोल झाली.



या फोटोत सोनम रेड कलरचा ड्रेस घातला आहे. तिचे खुले केस तिचे सौंदर्य खुलवत आहेत. मग या फोटोत खटकण्यासारखे असे काय आहे? तर या फोटोत सोनम  आपल्या हाताने स्वत:चे टॉप वर खेचताना दिसतेय. नेमकी हीच बाब लोकांना खटकली आहे. खरे तर अनेकांना सोनमचा हा फोटो आवडलाही. एक लाखांवर लोकांनी या फोटोला लाईक केले. पण अनेकांना सोनमचा हा बोल्ड फोटो खटकला. यानंतर ट्रोलर्सनी सोनमला नाही, नाही ते सुनावलेय. ‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती,’ असे एका युजरने लिहिलेय. ‘एक सरदार की कुडी होने के बाद भी यह किया,’ असे दुसºया एका युजरने सोनमला सुनावले आहे. अद्याप सोनमने ट्रोलर्सला कुठलेही उत्तर दिलेले नाही.  
सोनमने अनेक हिट पंजाबी सिनेमात काम केले आहे. ताज्या मुलाखतीत सोनम तिच्या करिअरवर बोलली होती. मी अनेक हिट चित्रपट केले आहे. सर्वांनी माझी प्रशंसा केली. मला सामान्य मुलीपासून सेलिब्रिटी बनवले. पण ही केवळ एक सुरूवात आहे. मला आणखी खूप मोठा पल्ला गाठायचायं. मला आणखी बरीच मेहनत करण्याची गरज आहे, असे ती म्हणाली होती.

Web Title: Punjabi actress Sonam Bajwa posted a photo that provoked the user!