पुलकित सम्राटने कृति खरबंदासोबत असलेल्या रिलेशनशीपबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला- आम्ही एकमेकांसोबत..

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 01:20 PM2020-06-29T13:20:01+5:302020-06-29T13:24:03+5:30

पुलकित सम्राटचे लग्न सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत झाले होते.

Pulkit samrat on the relationship with kriti kharbanda | पुलकित सम्राटने कृति खरबंदासोबत असलेल्या रिलेशनशीपबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला- आम्ही एकमेकांसोबत..

पुलकित सम्राटने कृति खरबंदासोबत असलेल्या रिलेशनशीपबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला- आम्ही एकमेकांसोबत..

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट अभिनेत्री कृति खरबंदाला डेट करतो आहे. लॉकडाऊनमध्ये दोघे एकत्र क्वॉलिटी टाईम स्पेंट करतायेत. राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार  एका मुलाखती दरम्यान पुलकित म्हणाला, लॉकडाऊनमध्ये आम्ही एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतो आहे. लॉकडाऊनमुळे आम्हाला एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची संधी मिळाली. या दोघांनी 'वीर की वेडिंग' आणि 'पागलपंती' सिनेमात एकत्र काम केले आहे. दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. पुल्कित सम्राट आणि कृति खरबंदाच्या फॅन्सना त्यांचे हे फोटो प्रचंड आवडत असून याच फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा असते.

पुलकित सम्राटचे लग्न सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत झाले होते. पण लग्नानंतर काहीच महिन्यात त्याने तिला घटस्फोट दिला. या घटस्फोटाचे कारण यामी गौतम असल्याचे बोलले गेले होते. त्यानंतर पुलकितच्या लाईफमध्ये कृतिची एंट्री झाली आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर पुलकित लवकरच, बुलबुल मॅरेज हॉल एकत्र दिसणार आहेत. पुलकित आणि कृतिसोबत सुनील ग्रोव्हर आणि डेजी शहासुद्धा या सिनेमात दिसणार आहे. रिपोर्टनुसार या सिनेमाची कथा उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरावर आधारित आहे. लग्नाची भवती या सिनेमाची कथा फिरणार आहे.

Web Title: Pulkit samrat on the relationship with kriti kharbanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.