चक्क भाईजानच्या सिनेमात दिसणार कृति खरबंदा - पुलकित सम्राटची जोडी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 14:39 IST2020-05-02T14:36:12+5:302020-05-02T14:39:55+5:30
कृति खरबंदा आणि पुलकित सम्राट गेल्या काही महिन्यांपूर्वीपासून रिलेशनशीपमध्ये आहेत.

चक्क भाईजानच्या सिनेमात दिसणार कृति खरबंदा - पुलकित सम्राटची जोडी !
कृति खरबंदा आणि पुलकित सम्राट गेल्या काही महिन्यांपूर्वीपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या दोघे एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करतायेत. याचदरम्यान सलमान खान प्रोडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या बुलबुल मॅरेज हॉल एकत्र दिसणार आहेत. पुलकित आणि कृतिसोबत सुनील ग्रोव्हर आणि डेजी शहासुद्धा या सिनेमात दिसणार आहे. न्यूज १८ च्या रिपोर्टनुसार या सिनेमाचे शूटिंग एप्रिल महिन्यातच सुरु होणार होते मात्र लॉकडाऊनमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे.
रिपोर्टनुसार या सिनेमाची कथा उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरावर आधारित आहे. लग्नाची भवती या सिनेमाची कथा फिरणार आहे. सुनील ग्रोव्हर या आधी सलमान खानच्या भारत सिनेमात दिसला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन रोहित नय्यर करणार आहे तर राज शांडिल्य सिनेमाचे संवाद लिहिणार आहेत.
बुलबुल मॅरेजच्या आधी सलमान खानने चिल्लर पार्टी, बजरंगी भाईजान, लवयात्री आणि नोटबुकसारख्या सिनेमाची निर्मिती केली आहे. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर सलमान सध्या 'राधे : इंडियाज मोस्ट वॉण्टेड' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मात्र लॉकडाऊनमुळे त्याच्या या सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. या सिनेमात सलमानसोबत दिशा पटानी दिसणार आहे. प्रभूदेव या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. सिनेमात सलमान एका हटके भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. यात अभिनेता जॅकी श्रॉफ देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.