काश्मीर फाईल्स प्रपोगंडा फिल्म आहे सिद्ध करा, विवेक अग्निहोत्रींची ममता बॅनर्जींना कायदेशीर नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 04:36 PM2023-05-09T16:36:35+5:302023-05-09T16:37:40+5:30

'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

Prove that Kashmir Files is a propaganda film Vivek Agnihotri legal notice to west bengal cm Mamata Banerjee | काश्मीर फाईल्स प्रपोगंडा फिल्म आहे सिद्ध करा, विवेक अग्निहोत्रींची ममता बॅनर्जींना कायदेशीर नोटीस

काश्मीर फाईल्स प्रपोगंडा फिल्म आहे सिद्ध करा, विवेक अग्निहोत्रींची ममता बॅनर्जींना कायदेशीर नोटीस

googlenewsNext

'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. खुद्द अग्निहोत्री यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली. सोमवारी 'द केरळ स्टोरी'वर बंदी घालण्याची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचाही उल्लेख केला होता, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी 'द काश्मीर फाईल्स' आणि बंगाल नरसंहारावरील त्यांच्या पुढच्या चित्रपटावर आरोप केले आणि त्याला अपप्रचार म्हटलं. हे दुखावणारे असून या कारणास्तव त्यांनी ममता बॅनर्जी यांना कायदेशीर नोटीस पाठवली असल्याचं विवेक अग्निहोत्री म्हणाले. त्यांच्या भाषणादरम्यान केलेल्या आरोपांमध्ये काय तथ्य आहे यासंदर्भात नोटीशीतून उत्तर मागण्यात आलंय. दरम्यान, 'द केरळ स्टोरी'चे निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनीही बंगालमधील बंदीला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी यांनी यासंदर्भात एएनआयशी संवाद साधला. “मी गेल्या काही दिवसांपासून शांत होतो. कोणीही मुख्यमंत्री,, मग दिल्लीचे मुख्यमंत्री असो, मोठे, पत्रकार, राजकारणी कधीही उठून काश्मीर फाईल्स प्रपोगंडा फिल्म होती असं म्हणतात. आता हे खूप झालं असं मला वाटतं. आता जे कोणी हे बोलतात त्यांनी येऊन चित्रपटातील कोणता डायलॉग, कोणता सीन किंवा कोणतं सत्य प्रपोगंडा आहे हे सिद्ध करावं. आमच्याकडून आम्ही कठोर कायदेशीर कारवाई करू,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

ममता बॅनर्जींनी उत्तर द्यावं

“सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काश्मीर फाईल्स आणि आगामी बंगालमधील नरसंहारावर येणाऱ्या चित्रपटावर आरोप केले. मला काश्मीर फाईल्स आणि आगामी चित्रपटासाठी भाजपनं स्पॉन्सर केलंय असं त्या म्हणाल्या. ही माझ्यासाठी दु:खद बाब आहे. या माझा रोजगार प्रभावित करणाऱ्या आणि खोट्या गोष्टी आहेत. आपल्या व्होटबँकेला खूश करण्यासाठी त्या असं म्हणाल्या.  आम्ही यासंदर्भात त्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यांच्या वक्तव्यामागील तथ्य काय आहे हे सांगावं. अन्यथा ही मानहानी आहे. माझ्या दृष्टीकोनातून एका व्यक्तीच्या उपजीविकेवर परिणाम करणारं हे वक्तव्य आहे,” असं अग्निहोत्री यांनी सांगितलं.

Web Title: Prove that Kashmir Files is a propaganda film Vivek Agnihotri legal notice to west bengal cm Mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.