प्रियांकाच्या आईचा अॅक्टिंग डेब्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 19:00 IST2016-08-20T13:30:54+5:302016-08-20T19:00:54+5:30
प्रियांका चोप्रा सध्या जोरात आहे. बॉलिवूड, हॉलिवूड, प्रॉडक्शन अशा सगळ्या ठिकाणी प्रियांका यशाची चव चाखतेय. पण यावेळी आम्ही प्रियांकाची ...
.jpg)
प्रियांकाच्या आईचा अॅक्टिंग डेब्यू!
प रियांका चोप्रा सध्या जोरात आहे. बॉलिवूड, हॉलिवूड, प्रॉडक्शन अशा सगळ्या ठिकाणी प्रियांका यशाची चव चाखतेय. पण यावेळी आम्ही प्रियांकाची नाही तर तिच्या आईची बातमी घेऊन आलो आहोत. होय, प्रियांकाची आई मधु चोप्रा या सुद्धा लवकरच मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे. होय, प्रियांकाचे स्वत:च प्रॉडक्शन हाऊस आहे. या प्रॉडक्शन हाऊसच्या ‘व्हेन्टिलेटर’ या मराठी सिनेमात मधू चोप्रा अॅक्टिंग डेब्यू करणार आहेत. सिनेमाच्या सुरुवातीच्या दृश्यात प्रियांका व मधू या दोघी मायलेकी (कॅमिओ)दिसणार आहेत. आशुतोष गोवारीकरही या सिनेमात अभिनय करणार असल्याची चर्चा आहे. एकंदर काय, तर हा चित्रपट यशस्वी होण्याच्यादृष्टीने प्रियांका कुठलीही कसर सोडणार नाहीयं,हेच खरे!!