प्रियंका म्हणते, मी कधीच डेटवर नव्हते !
By Admin | Updated: July 2, 2016 03:18 IST2016-07-02T03:18:16+5:302016-07-02T03:18:16+5:30
प्रियंका चोप्रा ही नेहमीच आपल्या खासगी आयुष्याबाबत सावध असते आणि फारशी बोलत नाही. हॉलीवूडमधील यशानंतर सध्या ती उंचीवर आहे.

प्रियंका म्हणते, मी कधीच डेटवर नव्हते !
प्रियंका चोप्रा ही नेहमीच आपल्या खासगी आयुष्याबाबत सावध असते आणि फारशी बोलत नाही. हॉलीवूडमधील यशानंतर सध्या ती उंचीवर आहे. यापूर्वी ती कधीही कॅज्युअल डेटवर नव्हती असे तिचे म्हणणे आहे.
एका मॅगेजिनला दिलेल्या मुलाखतीत प्रियंका म्हणते, मी कधीच डेटवर गेलेली नाही. मी नेहमीच संबंधांना प्राधान्य देते.ह्ण
बे वॉच चित्रपटात काम करणाऱ्या प्रियंकाने डेटींग आणि रिलेशनशिपसंदर्भात स्वत:ची मते व्यक्त केली. ह्यहे अगदी वेगवेगळे आहे. तुम्हाला कोणी आवडते. तुम्ही एकमेकांना भेटता, तुम्ही रिलेशनशीपमध्ये असता. तुम्ही एकमेकांना उत्तर देण्यास बाध्य असता. डेटींगमध्ये उत्तरे देण्याची बांधिलकी नसते. मी असे कधीच करणार नाही, असेही तिने सांगितले.
प्रियंका ही शाहीद कपूर आणि हरमन बावेजासमवेत डेटवर होती, अशा अफवा यापूर्वी उठल्या होत्या.