Priyanka Nick Wedding : प्रियांकाला पडला विसर; मग लोकांनीच सजवले ‘बरेली गर्ल’चे घर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 14:01 IST2018-12-02T13:59:21+5:302018-12-02T14:01:32+5:30

‘बरेली गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास पती-पत्नी झालेत. काल शनिवारी (१ डिसेंबर) त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. आज हे कपल हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होत आहेत. साहजिक बरेलीवासीयांचा आनंद शिगेला पोहोचला आहे.

Priyanka Nick Wedding: priyanka forget her bareilly house married with nick jonas in jodhpur | Priyanka Nick Wedding : प्रियांकाला पडला विसर; मग लोकांनीच सजवले ‘बरेली गर्ल’चे घर!!

Priyanka Nick Wedding : प्रियांकाला पडला विसर; मग लोकांनीच सजवले ‘बरेली गर्ल’चे घर!!

ठळक मुद्दे  एका चाहतीने प्रियांकासाठी  बरेलीहून एक खास भेटवस्तू पाठविली आहे. होय, निशा मिश्रा नावाच्या एका मुलीने थेट बरेलीहून सुरमा आणि एक काजळाची डबी पाठविली.

‘बरेली गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन सिंगर निक जोनास पती-पत्नी झालेत. काल शनिवारी (१ डिसेंबर) त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. आज हे कपल हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होत आहेत. साहजिक बरेलीवासीयांचा आनंद शिगेला पोहोचला आहे. लग्नाच्या धामधुमीत प्रियांका आपल्या बरेलीतील घराला विसरली. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत प्रियांकाच्या बरेलीतील घरात कुठलाही झगमगटात नव्हता. बरेलीतील चाहत्यांना ही गोष्ट खटकली आणि ही गोष्ट प्रशासनाच्या कानावर गेली. अखेर प्रशासनाच्या मदतीने बरेलीतील नागरिकांनी प्रियांकाच्या घरावर रोषणाई केली.


प्रियांकाचे बरेलीतील शेजारी राहुल राज सक्सेना यांनी सांगितले की, प्रियांकाच्या लग्नामुळे अख्ख्या बरेलीत उत्साह संचारला आहे. लग्नानंतर प्रियांकाने एकदा तरी बरेलीला यावे, अशी अनेकांची इच्छा आहे.
बरेली हे प्रियांका चोप्राचे स्वर्गीय वडिल अशोक चोप्रा आणि मधू चोप्रा यांची कर्मभूमी राहिली आहे. प्रियांका चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी अशोक चोप्रा बरेलीत कस्तूरी नामक रूग्णालय चालवते. बरेलीच्या आर्मी स्कूलमध्ये प्रियांका शिकली आहे.



 

बरेलीहून आले सुरमा-काजळ

  एका चाहतीने प्रियांकासाठी  बरेलीहून एक खास भेटवस्तू पाठविली आहे. होय, निशा मिश्रा नावाच्या एका मुलीने थेट बरेलीहून सुरमा आणि एक काजळाची डबी पाठविली. प्रियांकाच्या मेकअप लिस्टमध्ये बरेलीचाच सुरमा आणि काजळ असावे, अशी निशाची इच्छा होती.  बरेलीहून पाठवण्यात आलेले हे सुरमा आणि काजळ जोधपूरला पोहचले असल्याचे बरेलीचे सुरमा व्यापारी जाहीद शमशी यांनी सांगितले.  
आज २ डिसेंबरला प्रियांका व निक हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होत आहेत. जोधपूरच्या उमेद भवन या रॉयल पॅलेसमध्ये हे शाही लग्न होणार आहे.  हिंदू पद्धतीच्या विवाहात निक अगदी राजसी थाटात बग्घीवरून एन्ट्री घेणार आहे. हिंदू पद्धतीनुसार होणा-या  लग्नात प्रियांका चोप्रा अबू जानी आणि संदीप खोसला किंवा सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलेल्या लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसणार आहे.  

 अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास व प्रियांका अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. याचवर्षी प्रियांकाच्या वाढदिवसाला निक भारतात आला होता आणि याचठिकाणी त्याने पीसीला लग्नासाठी प्रपोज केली. यानंतर भारतातचं प्रियांका व निकचा ‘रोका’ झाला होता.  लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील. यापैकी एक दिल्लीत होईल तर दुसरे मुंबईत. 

Web Title: Priyanka Nick Wedding: priyanka forget her bareilly house married with nick jonas in jodhpur