Priyanka Nick Wedding : ‘देसी गर्ल’साठी मि. जोनासने गायले गाणे...पाहा, रोमॅन्टिक व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 11:19 IST2018-12-02T11:19:49+5:302018-12-02T11:19:59+5:30

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास अखेर  लग्नबेडीत अडकले . जोधपूरमधील उमेद भवन येथे त्यांचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला. आता त्याचा एक रोमॅन्टिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा रोमॅन्टिक व्हिडिओ अनेकार्थाने खास आहे.

Priyanka Nick Wedding: nickyanka romantic videos !! | Priyanka Nick Wedding : ‘देसी गर्ल’साठी मि. जोनासने गायले गाणे...पाहा, रोमॅन्टिक व्हिडिओ!!

Priyanka Nick Wedding : ‘देसी गर्ल’साठी मि. जोनासने गायले गाणे...पाहा, रोमॅन्टिक व्हिडिओ!!

ठळक मुद्देया व्हिडिओत निकच्या लोकप्रिय गाण्यावर प्रियांकाचा हॉट डान्स पाहायला मिळतोय. निकने हे गाणे त्याच्या चाहत्यांसाठी गायले होते. पहिल्यांदाच आता त्याने हे गाणे प्रियाकांसाठी गायले आहे. 

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास अखेर  लग्नबेडीत अडकले . जोधपूरमधील उमेद भवन येथे त्यांचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला. आता त्याचा एक रोमॅन्टिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा रोमॅन्टिक व्हिडिओ अनेकार्थाने खास आहे.
  प्रियांका आणि निकने ‘वोग’ या जगप्रसिद्ध  मॅक्झिनसाठी रोमॅन्टिक फोटोशूट केले आहे. ‘वोग’ मॅक्झिनच्या जानेवारी अंकासाठी या दोघांनी त्यांचे प्री-वेडिंग शूट केले आहे. या मॅक्झिनवर त्यांचा कव्हर फोटोदेखील झळकणार आहेत. या फोटोशूटमधील काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ते तुम्ही पाहिलेच. यावेळी प्रियांका व निकचा  एक व्हिडिओ देखील शूट करण्यात आला.या व्हिडिओत निकच्या लोकप्रिय गाण्यावर प्रियांकाचा हॉट डान्स पाहायला मिळतोय. निकने हे गाणे त्याच्या चाहत्यांसाठी गायले होते. पहिल्यांदाच आता त्याने हे गाणे प्रियाकांसाठी गायले आहे. 


प्रियांका चोप्रा आणि निक जोनास काल १ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने लग्नबंधनात अडकले. आज २ डिसेंबरला हे कपल हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होणार आहे. जोधपूरच्या उमेद भवन या रॉयल पॅलेसमध्ये हे शाही लग्न होणार आहे.  हिंदू पद्धतीच्या विवाहात निक अगदी राजसी थाटात बग्घीवरून एन्ट्री घेणार आहे. हिंदू पद्धतीनुसार होणा-या  लग्नात प्रियांका चोप्रा अबू जानी आणि संदीप खोसला किंवा सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलेल्या लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसणार आहे.   


अमेरिकन पॉप सिंगर निक जोनास व प्रियांका अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. याचवर्षी प्रियांकाच्या वाढदिवसाला निक भारतात आला होता आणि याचठिकाणी त्याने पीसीला लग्नासाठी प्रपोज केली. यानंतर भारतातचं प्रियांका व निकचा ‘रोका’ झाला होता.  लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील. यापैकी एक दिल्लीत होईल तर दुसरे मुंबईत. 

Web Title: Priyanka Nick Wedding: nickyanka romantic videos !!