Priyanka Nick Wedding : निकने सांगितली त्यांची प्रेमकहाणी, प्रियांकाने होकार द्यायला लावला एवढा वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 19:36 IST2018-11-30T19:34:52+5:302018-11-30T19:36:29+5:30

प्रियांका व निक जोनास जोधपूरमध्ये लग्नबेडीत अडकणार आहेत. प्रियांका आणि निक या दोघांमध्ये १० वर्षांचे अंतर आहे.

Priyanka Nick Wedding: Nick Jonas told her love story | Priyanka Nick Wedding : निकने सांगितली त्यांची प्रेमकहाणी, प्रियांकाने होकार द्यायला लावला एवढा वेळ

Priyanka Nick Wedding : निकने सांगितली त्यांची प्रेमकहाणी, प्रियांकाने होकार द्यायला लावला एवढा वेळ

ठळक मुद्देप्रियांका आणि निक या दोघांमध्ये १० वर्षांचे अंतर प्रियंका-निकचा विवाह २ आणि ३ डिसेंबर रोजी पडणार पार


प्रियांका व निक जोनास जोधपूरमध्ये लग्नबेडीत अडकणार आहेत. प्रियांका बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे तर निक अमेरिकन गायक. प्रियांका आणि निक या दोघांमध्ये १० वर्षांचे अंतर आहे. प्रियांका ३६ वर्षांची तर निक २६ वर्षांचा आहे. त्यामुळे या दोघांची भेट कुठे झाली व त्यांच्या प्रेमकहाणीला कशी सुरूवात झाली, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. निकने त्यांच्या प्रेमकहाणीतील काही गोष्टी सांगितल्या असून प्रियांकाने ४५ सेकंद होकार द्यायला लावल्याचे सांगितले. 


निक जोनास म्हणाला की, मी तिच्याशी ट्विटरद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तिला मेसेजही केले पण गंमतीचा भाग असा होता की तिला ट्विटरवर केलेले मॅसेज तिची टीमही पाहू शकत होती. तिने मला ही गोष्ट सांगितल्यावर मी तसे करणे त्वरीत थांबवले. मी तिच्याशी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आम्ही मेसेजवर बोलायचो आणि अशा प्रकारे आमच्या प्रेमकहाणीला सुरूवात झाली. एके दिवशी मी तिला लग्नाची मागणी घातली आश्चर्य म्हणजे तिने विचार करायला केवळ ४५ सेकंद घेतली. ४५ सेकंद शांत बसल्यानंतर तिने मला होकार दिला. तो क्षण मी आयुष्यात कधीही विसरू शकलो नाही. प्रियंका आणि निकचा विवाह २ आणि ३ डिसेंबर रोजी जोधपूरच्या उमेद भवन पॅलेस हॉटेलमध्ये पार पडणार आहे. हा शाही विवाह हिंदु आणि ख्रिश्चन पद्धतीने पार पडणार आहे. या शाही लग्नासाठी जोधपूरचे उमेद भवन अगदी नववधूप्रमाणे नटले आहे. अख्खा महल लाईट्सच्या झगमगाटाने न्हाऊन निघाले आहे. 

Web Title: Priyanka Nick Wedding: Nick Jonas told her love story