प्रियांकाला मिळावा ‘फेक हास्या’साठी अ‍ॅवॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2016 21:07 IST2016-10-26T20:44:28+5:302016-10-26T21:07:32+5:30

प्रियांका चोप्रा हिचे हास्य फसवे असल्याने तिला अ‍ॅवॉर्ड मिळायला हवा अशी टीका कंगना राणौतने केली आहे. कंगाना आपल्या वक्तव्याने ...

Priyanka gets 'Fake Laughter' Award | प्रियांकाला मिळावा ‘फेक हास्या’साठी अ‍ॅवॉर्ड

प्रियांकाला मिळावा ‘फेक हास्या’साठी अ‍ॅवॉर्ड

ong>प्रियांका चोप्रा हिचे हास्य फसवे असल्याने तिला अ‍ॅवॉर्ड मिळायला हवा अशी टीका कंगना राणौतने केली आहे. कंगाना आपल्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी तिने आपला निशाणा प्रियांका चोप्रावर लावला आहे.

मीडियात ट्रेन्ड होत असलेल्या बातम्यानुसार, एका कार्यक्रमादरम्यान कंगनाने ‘बॉलिवूडमधील सर्वांत फेक लाफचा (बानवटी हास्य) अ‍ॅवॉर्ड प्रियांका चोप्राला द्यायला हवा’ असे सांगितले. प्रियांका व कंगनाने फॅशन या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटासाठी दोघांच्या अभिनयासाठी प्रशंसा झाली होती. फॅशन चित्रपटाच्या चित्रिकरणापासूनच दोघींमधील वाद चव्हाट्यावर येत आहेत. आता पुन्हा एकदा कंगनाने केलेल्या आरोपामुळे वादाच्या फैरी झडतील असे वाटते.

कंगना व प्रियांका दोघेही अमेरिकेत आपआपल्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत. कंगना सिमरनची शूटिंग करीत आहे, तर प्रियांका क्वांटिको २ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्या दोघी अमेरिकेत असल्या तरी त्यांच्यातील वाद बॉलिवूडमध्ये चांगलाच चर्चिला जात आहे. कंगना व हृतिक यांच्यातील वाद मिटण्याऐवजी कंगनाने त्यात राकेश रोशन यांना ओढले. यावर राकेश रोशन यांना आपले स्पष्टीकरण द्यावे लागले होते. प्रियांका व रोशन कुटुंबियाचे जवळचे संबध आहेत. याचमुळे  कंगनाने प्रियांकावर निशाणा साधला असावा का? असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.

कंगनाने केलेल्या टीकेवर प्रियांकाची काय प्रतिक्रिया असणार यावर बॉलिवूडचे लक्ष लागले आहे. कंगनाने यापूर्वी अनेकांवर आपल्या शब्दांचे बाण चालविले आहेत. यात आदित्य पांचोली, शेखर व अध्ययन सुमन व दीपिका पादुकोण यांचा समावेश आहे. 

Web Title: Priyanka gets 'Fake Laughter' Award