निक जोनाससोबत हॉस्पिटलबाहेर दिसली प्रियंका चोप्रा, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 14:55 IST2019-09-03T14:55:10+5:302019-09-03T14:55:36+5:30

सध्या दोघेही वेगळ्याच प्लॅनिंगमध्ये आहेत. प्रियंका चोप्रा आणि निक जोनास लॉस अँजेलिसमध्ये कोटींचे नवीन घर विकत घेण्याचं प्लानिंग करत आहेत.

Priyanka Chopra's Secret hospital visit with Nick Jonas | निक जोनाससोबत हॉस्पिटलबाहेर दिसली प्रियंका चोप्रा, हे आहे कारण

निक जोनाससोबत हॉस्पिटलबाहेर दिसली प्रियंका चोप्रा, हे आहे कारण

प्रियंका आणि निक ही जोडी फक्त भारतातच नाही तर जगभरात खूप लोकप्रिय आहे.प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्याविषयी सगळ्याच गोष्टी जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. ती कुठे फिरते, कोणत्या एव्हेंटला जाते सगळ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहचते. नुकतेच निक आणि प्रियंका दोघांनाही एका हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट केले गेले. हॉस्पिटलबाहेरचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताच चाहते मात्र संभ्रमात आहे. फोटो पाहून अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. मात्र प्रियंका हॉस्पिटलमध्ये स्वतःसाठी नाहीतर तिच्या चाहतीला भेटण्यासाठी गेली होती.यावेळी प्रियंका आणि निकसोबत निकचा भाऊ जो आणि केविनसुद्धा होते.

 

विशेष म्हणजे ही चाहती जोनास ब्रदर्सच्या हॅप्पीनेस बिगिन्स कॉन्सर्टला पोहचू शकली नव्हती त्यामुळे जोनास ब्रदर्सनीच हॉस्पिटलमध्ये जाऊन तिची भेट घेतली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला रसिकांचे खूप सारे लाईक्स आणि कमेंटस पाहायला मिळत आहे.  त्यामुळे प्रियंका तिचे फॅमिल प्लॅनिंग करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या दोघेही वेगळ्याच प्लॅनिंगमध्ये आहेत. प्रियंका चोप्रा आणि निक जोनास लॉस अँजेलिसमध्ये कोटींचे नवीन घर विकत घेण्याचं प्लानिंग करत आहेत.   

टीएमझेडच्या रिपोर्टनुसार निक जोनसने लॉस अँजेलिसचं जुनं घर विकलं आहे, जिथे तो लग्नाच्या आधी रहात होता. आता निक प्रियंकासोबत राहण्यासाठी नवीन घर विकत घेण्यासाठी शोधत आहेत. नवीन घरासाठी प्रियंका व निकचं बजेट २० मिलियन डॉलर (जवळपास १४१ कोटी) आहे. नवीन घर विकत घेण्यासाठी निकने लॉस अँजेलिसमधील जुनं घर विकले आहे. निकच्या जुन्या घरात पाच बेडरूम, ४ ते ५ बाथरूम होते. निकच्या घरात एक शानदार पूलही होता आणि त्याच्या घरातून पर्वत व निसर्ग दिसत होते. प्रियंका व निक अद्याप कोणत्या दुसऱ्या घरात शिफ्ट झाले नाहीत. ते अद्याप नवीन घर शोधत आहे. 


 

Web Title: Priyanka Chopra's Secret hospital visit with Nick Jonas