भारतात परतलेल्या प्रियंका चोप्रापेक्षा तिच्या विदेशी बॉडीगार्डची होतेय जास्त चर्चा, पर्सनॅलिटीवर नेटकरी फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 12:05 IST2022-11-04T12:04:50+5:302022-11-04T12:05:31+5:30

Priyanka Chopra : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा नुकतीच भारतात परतली आहे आणि सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत येत आहे.

Priyanka Chopra, who returned to India, is talking about her foreign bodyguard more than her, Netkari Fida on personality! | भारतात परतलेल्या प्रियंका चोप्रापेक्षा तिच्या विदेशी बॉडीगार्डची होतेय जास्त चर्चा, पर्सनॅलिटीवर नेटकरी फिदा!

भारतात परतलेल्या प्रियंका चोप्रापेक्षा तिच्या विदेशी बॉडीगार्डची होतेय जास्त चर्चा, पर्सनॅलिटीवर नेटकरी फिदा!

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) नुकतीच भारतात परतली आहे आणि सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत येत आहे. व्यस्त शेड्युलमधून स्वतःसाठी वेळ काढून ती वेगवेगळ्या ठिकाणांचा दौरा करत आहे. आता प्रियंका चोप्रासोबत सोशल मीडियावर तिचा विदेशी बॉडीगार्डही चर्चेत आला आहे. 

खरेतर, गुरुवारी प्रियंका चोप्रा मुंबईतील ताजमध्ये स्पॉट झाली होती जिथे संपूर्ण मीडिया तिला कव्हर करण्यासाठी आले होते. प्रियांका येताच तिच्या स्टायलिश बॉडीगार्डने मीडियाला तिच्यापासून दूर ठेवले. अशा स्थितीत त्याचा लूक,डॅशिंग अॅटिट्यूड सर्व कॅमेऱ्यात कैद झाले. हा व्हिडिओ पाहताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर सर्वत्र प्रियांकाच्या बॉडीगार्डच्या चर्चा सुरू झाल्या. यावर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या.


एका युजरने लिहिले की प्रियंकाचा बॉडीगार्ड रायन रेनॉल्ड्ससारखा दिसतो आहे. तर दुसऱ्या युजरने देखील त्याला डेडपूलसारखे म्हटले. तर आणखी एका युजरने लिहिले की, बॉडीगार्डपण अमेरिकेतून घेऊन आली आहे प्रियंका. खरेतर रॉयन रेनॉल्ड्स हॉलिवूड अभिनेता आहे जो डेडपूल चित्रपटात झळकला होता. रॉयन मार्वलमधील सुपरहिरो आहे.


काही दिवसांसाठी प्रियंका चोप्रा मुंबईत परतली आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची लेक मालतीदेखील तिच्यासोबत आहे पण अद्याप तिची झलक कोणाला पाहायला मिळाली नाही. तिचे काही प्रोजेक्ट्सचे काम इथे आहे. ते पार पडल्यानंतर ती अमेरिकेत परतणार आहे.

Web Title: Priyanka Chopra, who returned to India, is talking about her foreign bodyguard more than her, Netkari Fida on personality!