बिकनीवर बिंदी लावलेला थ्रोबॅक फोटो प्रियंका चोप्रानं केला शेअर, फोटोत ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 18:36 IST2021-03-26T18:36:26+5:302021-03-26T18:36:50+5:30

प्रियंका चोप्राचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.

Priyanka Chopra shares a throwback photo of her wearing a bikini, it's hard to identify in the photo | बिकनीवर बिंदी लावलेला थ्रोबॅक फोटो प्रियंका चोप्रानं केला शेअर, फोटोत ओळखणंही झालंय कठीण

बिकनीवर बिंदी लावलेला थ्रोबॅक फोटो प्रियंका चोप्रानं केला शेअर, फोटोत ओळखणंही झालंय कठीण

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ती 'अनफिनिश्ड' या तिच्या पुस्तकामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर अमेरिकन टीव्ही प्रेझेंटर ओपेरा विन्फ्रेला दिलेल्या मुलाखतीनंतर ती सोशल मीडियावर खूप चर्चेत आली होती. हल्ली ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. दरम्यान तिने सोशल मीडियावर अशी पोस्ट शेअर केली आहे ज्यातून तिने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये तिने बिकनी टॉपमधील थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

प्रियंका चोप्राचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. हा थ्रोबॅक फोटो खूप जुना आहे. या फोटोत प्रियंका फक्त १९ वर्षांची आहे. तिने व्हाइट बिकनी टॉपसोबत पलाजो परिधान केला आहे. यासोबत तिने कपाळावर बिंदी लावली आहे. हा फोटो पाहून प्रियंकाला ओळखणं कठीण झालं आहे. आता तिच्यात खूप बदल झाला आहे.


प्रियंका चोप्राने फोटो शेअर करत लिहिले की, शर्मिली, कधी याबद्दल ऐकले नसेल जेव्हा ती १९ वर्षांची होती. या फोटोला १६ लाखांहून जास्त पसंती मिळाली आहे. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. हा फोटो पाहून वाटत आहे की कदाचित तिचा हा फोटो मॉडेलिंगच्या दिवसांतील आहे. यात ती बोल्ड अंदाजात दिसते आहे.


प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती 'द व्हाइट टाइगर' चित्रपटात दिसली होती. रमिन बहारानी दिग्दर्शित या चित्रपटात प्रियंकासोबत आदर्श गौरव आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत होते.

Web Title: Priyanka Chopra shares a throwback photo of her wearing a bikini, it's hard to identify in the photo