Priyanka Chopraने शेअर केली फॅमिली ट्रिपचे unseen फोटो, मालतीच्या क्युटनेसनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 10:24 IST2023-06-15T10:18:26+5:302023-06-15T10:24:42+5:30

प्रियंका चोप्रा आपली लाडकी लेक मालतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Priyanka chopra shares magic family vacation pics daughter malti caught attention in 3rd holding actress bag | Priyanka Chopraने शेअर केली फॅमिली ट्रिपचे unseen फोटो, मालतीच्या क्युटनेसनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Priyanka Chopraने शेअर केली फॅमिली ट्रिपचे unseen फोटो, मालतीच्या क्युटनेसनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

प्रियंका चोप्रा सध्या मुलगी मालती मेरी जोनासचे फोटो शेअर करताना दिसत आहे. देसीगर्ल नुकतीच कुटुंबासोबत व्हॅकेशनवर गेली आहे. यादरम्यान काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यूजर्सची नजर चिमुकल्या मालतीच्या फोटोंवरुन हटत नाहीय. 

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी त्यांच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून कुटुंबासोबत वेळ घालवला आहे.
प्रियंका चोप्राने कुटुंबासोबतच्या आउटिंगचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. यामध्ये पती निकसोबत बोट राईडचा आनंद घेताना एक सुंदर सेल्फी आणि मालती मेरी जोनासची ट्रेन प्रवासाचा आनंद घेतानाच्या फोटाचा सामावेश आहे.  

याशिवाय व्हेकेशनच्या काही फोटोंमध्ये मालती मेरी प्रियंकाच्या पर्सची छेड काढतानाही दिसत आहे. दुसर्‍या फोटोत
 मालती पूलचा आनंद घेताना दिसत आहे. एका फोटोत मालती तिच्या आजोबा आणि वडिलांचा हात धरताना दिसत आहे. त्याच वेळी, प्रियांकाची आई मधु चोप्रा आणि तिची सासू डेनिस जोनास देखील एका फोटोमध्ये एकत्र दिसत आहेत.

मालतीचा जन्म जानेवारी २०२२ मध्ये सरोगसीद्वारे झाला होता. तिची पहिली झलक या वर्षी जानेवारीमध्ये लॉस एंजेलिसमध्ये जोनास ब्रदर्स हॉलीवूड वॉक ऑफ फेममध्ये दिसली.

Web Title: Priyanka chopra shares magic family vacation pics daughter malti caught attention in 3rd holding actress bag