रेड कार्पेटवर पडली प्रियंका चोप्रा मग जे झालं ते... अभिनेत्री म्हणाली, 'सगळ्यांनी आपलं कॅमेरे..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 09:52 IST2023-05-10T09:50:37+5:302023-05-10T09:52:59+5:30

यावर भाष्य करतामा प्रियंका म्हणाली मी माझ्या २३ वर्षांच्या करिअरमध्ये कधी असं पाहिलं नाही.

Priyanka chopra reveals when she fall down on love again premiere the paparazzi put their cameras down | रेड कार्पेटवर पडली प्रियंका चोप्रा मग जे झालं ते... अभिनेत्री म्हणाली, 'सगळ्यांनी आपलं कॅमेरे..'

रेड कार्पेटवर पडली प्रियंका चोप्रा मग जे झालं ते... अभिनेत्री म्हणाली, 'सगळ्यांनी आपलं कॅमेरे..'

प्रियंका चोप्राला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. जगभरात तिचा चाहता वर्ग आहे. नुकताच तिचा सिटाडेल रिलीज झाला आहे. ज्याचा प्रमोशनसाठी ती भारतात देखील आली होती. सध्या ती लव अगेन सिनेमामुळे चर्चेत आहे, याच्या प्रमोशनमध्ये ती बिझा आहे. आता अभिनेत्रीने खुलासा केला की, या सिनेमाच्या प्रिमीअर दरम्यान ती न्यूयॉर्कमध्ये पडली होती. ही घटना घडनाता अभिनेत्रीने फोटो पापाराझीने क्लिक न केल्यामुळे तिने आनंद व्यकत केला.   

काही दिवसांपूर्वी प्रियंका आणि निक जोनस लव अगेनच्या प्रीमियरमध्ये आले होते. या कार्यक्रमादरम्यान दोघे हातात हात घालून आले होते. या सिनेमात निकचा देखील कॅमिओ आहे. 

अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान प्रियंका या गोष्टीचा खुलासा केला. रेड कार्पेटवर संपूर्ण मीडिया असते. प्रत्येक फोटोग्राफर फोटो क्लिक करत असतो. माझी सँडल ठिक करताना मी पडले. यादरम्यान उपस्थित फोटोग्राफर्सचे कौतुक तिने केलं.    

पुढे प्रियंका म्हणाली मी माझ्या २३ वर्षांच्या करिअरमध्ये कधी असं पाहिलं नाही. सगळ्यांनी आपलं कॅमेरे खाली करत मला म्हटलं चिंता करु नकोस. तू तुझा वेळ घे. मी एका सेकंडासाठी घाबरले होते. पण जोवर मी उठून उभे राहिले नाही तोवर कुणी फोटो क्लिक केला नाही. यादरम्यानची एकही क्लिप सोशल मीडियावर नाही प्रियंकाने आनंद व्यक्त केला. प्रियंका म्हणाली त्यावेळी पाच लोक होती ज्यांनी माझाची मदत केली. माझ्या पतीने पण माझी मदत केली.
 

Web Title: Priyanka chopra reveals when she fall down on love again premiere the paparazzi put their cameras down