प्रियांका चोप्रा घेणार का बॉलिवूड मधून संन्यास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 17:36 IST2017-09-08T12:04:58+5:302017-09-08T17:36:54+5:30

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास यशस्वीरित्या पार पडून आणि ग्लोबल आयकॉन बनलेली म्हणजे प्रियांका चोप्रा. सध्या ती हॉलिवूडच्या एक ...

Priyanka Chopra to retire from Bollywood? | प्रियांका चोप्रा घेणार का बॉलिवूड मधून संन्यास?

प्रियांका चोप्रा घेणार का बॉलिवूड मधून संन्यास?

लिवूड ते हॉलिवूड असा प्रवास यशस्वीरित्या पार पडून आणि ग्लोबल आयकॉन बनलेली म्हणजे प्रियांका चोप्रा. सध्या ती हॉलिवूडच्या एक नाही तर दोन चित्रपट करत आहे.  त्यात ती इतकी व्यस्त आहे की ती बॉलिवूडमध्ये वेळ देऊ शकत नाही आहे. तिच्या चाहत्या वर्गमध्ये अशी पण बातमी पसरली आहे की लवकर प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधून संन्यास घेणार आहे.

या सगळ्या बातम्यावर प्रियांकाने उत्तर दिले आहे, नुकत्याच पार पडलेल्या टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रियांकाला गेस्ट ऑफ ऑनर म्हणून सन्मानित करण्यात आले. तिथे दिलेल्या एका मुलाखतीत तिने या सगळ्या बातम्या अफवा असल्याचे सांगितले. ती म्हणाली की, ''कॉन्टिकॉच्या एक्सटेंडेड स्टोरीमुळे मी सध्या बॉलिवूडच्या चित्रपटांना वेळ देऊ शकत नाही आहे पण येणाऱ्या वर्षात मला बॉलिवूडचे दोन चित्रपट करण्याची इच्छा आहे. पण जोपर्यंत ते प्रोजेक्ट कन्फर्म होत नाही तोपर्यंत मी त्यावर काही बोलणार नाही असेदेखील ती म्हणाली आहे. काही दिवसांपूर्वीच ती गणेशउत्सवा दरम्यान ती मुंबईत आली होती. यावेळी अशी ही एक चर्चा रंगली होती की संजय लीला भंसाळी यांच्या आगामी चित्रपट गुस्ताखियांमध्ये प्रियांका मुख्य भूमिका साकारणार आहे आणि या चित्रपटातील अभिनेत्याचे नाव फायनल करण्यासाठी प्रियांका मुंबईत आली होती. मात्र चित्रपटाच्या टेड्स मॅच न झाल्यामुळे ती हा चित्रपटच सोडला. 






 प्रियांकाने आपले गोल पूर्ण सेट केले आहे तिला फक्त बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या चित्रपटात  नाही तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या चित्रपटात सुद्धा काम करायची इच्छा आहे. 

Web Title: Priyanka Chopra to retire from Bollywood?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.