न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राने सुुरू केले भारतीय रेस्टॉरंट, शेअर केलेत फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 10:39 IST2021-03-07T10:39:11+5:302021-03-07T10:39:52+5:30

प्रियंकाने रेस्टॉरंटच्या पूजेचे फोटो शेअर केले आहेत. सोबत रेस्टॉरंटची एक छोटीशी झलकही दाखवली आहे.

priyanka chopra to open indian food restaurant in new york city |  न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राने सुुरू केले भारतीय रेस्टॉरंट, शेअर केलेत फोटो

 न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राने सुुरू केले भारतीय रेस्टॉरंट, शेअर केलेत फोटो

ठळक मुद्देप्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकतीच ती राजकुमार रावसोबतच ‘द व्हाईट टायगर’मध्ये दिसली. आता तिच्याकडे हॉलिवूडचे दोन सिनेमे आहेत.

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून ‘अनफिनिश्ड’ या आत्मचरित्रामुळे चर्चित आहे. या पुस्तकात प्रियंकाने व्यक्तिगत आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. आता पीसी आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. हे कारण काय तर इंडियन रेस्टॉरंट. होय, न्यूयॉर्कमध्ये प्रियंकाच्या मालकीचे एक इंडियन रेस्टॉरंट सुरु होत आहे. प्रियंकाने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. रेस्टॉरंटच्या नावाचा खुलासाही तिने केला आहे.
प्रियंकाने रेस्टॉरंटच्या पूजेचे फोटो शेअर केले आहेत. सोबत रेस्टॉरंटची एक छोटीशी झलकही दाखवली आहे.

‘न्यूयॉर्क सिटीत सादर आहे, एक नवे रेस्टॉरंट सोना. या रेस्टॉरंटमध्ये भारतीय खाद्यपदार्थांबद्दलचे माझे प्रेम मिळेल. भारत आणि ज्या चवीसोबत मी मोठे झाले त्याची झलक येथे तुम्हाला पाहायला मिळेल. सोना या महिन्याच्या अखेरपर्यंत सुरु होत आहे, आपली प्रतीक्षा असेन,’ असे या पोस्टमध्ये प्रियंकाने लिहिले आहे. शेअर केलेल्या पहिल्या फोटोत तिच्या रेस्टॉरंटचे नाव आहे. दुस-या फोटोत प्रियंका आणि तिचा मित्र मनीष दिसतोय. तर तिस-या फोटोत ती पती निकसोबत दिसतेय.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकतीच ती राजकुमार रावसोबतच ‘द व्हाईट टायगर’मध्ये दिसली. आता तिच्याकडे हॉलिवूडचे दोन सिनेमे आहेत. लवकरच ती सॅम ह्यूएन आणि सेलिन डायॉनसोबत ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि कियानू रीव्ससोबत ‘मॅट्रिक्स 4’ या सिनेमात दिसणार आहे.

Web Title: priyanka chopra to open indian food restaurant in new york city