प्रियांका चोप्रा रिलेशनशिपमध्ये तर नाही?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2017 15:04 IST2017-07-16T09:21:06+5:302017-07-16T15:04:59+5:30
प्रियांका चोप्रा सध्या जाम बिझी आहे. ‘बेवॉच’नंतर प्रियांकाच्या झोळीत आणखी दोन चित्रपट आहेत. एक म्हणजे,‘ए किड लाइक जॅक’ आणि ...

प्रियांका चोप्रा रिलेशनशिपमध्ये तर नाही?
प रियांका चोप्रा सध्या जाम बिझी आहे. ‘बेवॉच’नंतर प्रियांकाच्या झोळीत आणखी दोन चित्रपट आहेत. एक म्हणजे,‘ए किड लाइक जॅक’ आणि दुसरा म्हणजे, ‘इजन्ट इट रोमॅन्टिक?. यापैकी ‘ए किड लाइक जॅक’चे शूटींग पूर्ण झाले आहे आणि ‘इजन्ट इट रोमॅन्टिक?’चे शूटींग सुरू आहे. याचदरम्यान प्रियांकाने स्वत:च्या प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटांचा धडाका चालवला आहे. ‘काय रे रास्कला’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियांका नुकतीच भारतात येऊन गेलीय. एकंदर काय तर प्रियांका जाम बिझी आहे. आता प्रियांका इतकी बिझी राहणार असेल तर रिलेशनशिपसाठी तिला वेळ कुठाय? पण आपल्याला प्रियांकाच्या आयुष्याबद्दल सगळेच कुठे माहित आहे कुठे? होय, अगदी ती रिलेशनशिपमध्ये आहे किंवा नाही, हेही आपल्याला ठाऊक नाही.
खुद्द प्रियांकाही हेच म्हणतेय. तू कामात इतकी बिझी आहेस. मग रिलेशनशिप किंवा लग्न यासाठी तुला अजिबात वेळ नाही, असे समजायचे काय? असा प्रश्न प्रियांकाला विचारला गेला. यावर प्रियांका ताडकन काय म्हणाली माहितीय? तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल सगळेच तर माहित नाहीयं ना? असा उलट प्रश्न तिने केला. आता तिच्या या प्रश्नातून अर्थ तर अनेक निघतात. आपल्याला प्रियांकाच्या आयुष्याबद्दल सगळेच माहित नाही, हे खरेच आहे. पण याचाच अर्थ प्रियांका कुणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये आहे, असा काढायचा का? कदाचित असे नसते तर माझ्या आयुष्याबद्दल तुम्हाला सगळेच तर माहित नाही ना, असे प्रियांका म्हणाली नसती. आता खरे काय, ते प्रियांकालाच ठाऊक़ कारण प्रियांका बरीच स्मार्ट आहे. तिने लपवून ठेवायचे ठरवले, तर ती लपवून ठेवू शकतेच की!!