प्रियांका चोप्रा-निक जोनास करणार या ठिकाणी Destination Wedding, तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 12:24 IST2018-10-03T12:15:55+5:302018-10-03T12:24:38+5:30

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास सध्या आपल्या लग्नाच्या तयारीला लागले आहे. साखरपुड्यानंतर सगळ्यांच लक्ष दोघांच्या लग्नाकडे लागले आहे.

Priyanka Chopra-Nick Jonas will start preparing for this destination Destination Wedding | प्रियांका चोप्रा-निक जोनास करणार या ठिकाणी Destination Wedding, तयारी सुरू

प्रियांका चोप्रा-निक जोनास करणार या ठिकाणी Destination Wedding, तयारी सुरू

ठळक मुद्देप्रियांका आणि निक जोधपूरच्या एका ज्वेलरी शॉपमध्ये खरेदी करताना दिसलेअजूनपर्यंत दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास सध्या आपल्या लग्नाच्या तयारीला लागले आहे. साखरपुड्यानंतर सगळ्यांच लक्ष दोघांच्या लग्नाकडे लागले आहे. मंगळवारी सकाळी दोघे प्रायव्हेट जेटने जोधपुरला पोहोचले होते. प्रियांका आणि निक दोघे जोधपूरच्या एका ज्वेलरी शॉपमध्ये खरेदी करताना दिसले.   
मीडिया रिपोर्ट्सनुसार  प्रियांका आणि निकने उम्मेद भवन पॅलेस आणि मेहरानगढच्या किल्ल्यात फेरफटाका मारून तिथल्या मॅनेजमेंटशी बोलताना देखील दिसले. दोघे लग्नासाठी लॉकेशन फायनल करत असल्याची चर्चा आहे. त्याच संध्याकाळी हे कपल मुंबईतदेखील परतले.  प्रियांका व निक दोघेही आपले लग्न यादगार बनवू इच्छितात. त्यामुळेच दोघींनीही आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे. 

अजूनपर्यंत दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार दोघे मुलांना घेऊन खूपच उत्सुक आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार प्रियांका आणि निक नेहमी मुलांबाबत बोलत असतात त्यामुळे त्यांना लवकर लग्न करायचे आहे. दोघांच्यामध्ये जबरदस्त केमिस्ट्री आहे आणि मुलांना घेऊन निक आणि प्रियांका एक्साइडेट आहेत. 

प्रियांका तिच्या ‘स्काय इज पिंक’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी असल्याने सध्या तिचा मुक्काम भारतात आहे.  यात तिच्या अपोझिट फरहान अख्तर दिसणार आहे प्रियांकाला भेटण्यासाठी निकही भारतात आला आहे.
 

Web Title: Priyanka Chopra-Nick Jonas will start preparing for this destination Destination Wedding