अबब...! एवढा मोठ्ठा केक पाहिलात का, प्रियांका चोप्रा-निक जोनासच्या वेडिंगचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 16:55 IST2018-12-05T16:51:06+5:302018-12-05T16:55:11+5:30

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला.

Priyanka Chopra-Nick Jonas Wedding cake is too big | अबब...! एवढा मोठ्ठा केक पाहिलात का, प्रियांका चोप्रा-निक जोनासच्या वेडिंगचा

अबब...! एवढा मोठ्ठा केक पाहिलात का, प्रियांका चोप्रा-निक जोनासच्या वेडिंगचा

ठळक मुद्देप्रियांका निकसोबत दिसली भला मोठा केक कापताना

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी हे कपल खूपच छान दिसत होते. त्या दोघांनाही त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर नव्या आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आता एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत प्रियांका निकसोबत भला मोठा केक कापताना दिसतो आहे. 

प्रियांका चोप्राचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पाहायला मिळतो आहे. यात प्रियांका निकसोबत भलामोठा केक कापताना दिसते आहे. हा केक कापताना दोघेही प्रचंड आनंदी दिसत आहेत. या केकची खासियत म्हणजे, हा केक ६ मजली आणि १८ फूट लांबीचा होता. प्रियांका-निक हा केक तलवारीने कापताना दिसतो आहे.   


अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये जगभरातील सेलेब्रिटींच्या मांदियाळीत हा विवाह सोहळा रंगला होता. १ डिसेंबरला निकचे वडील जोनास सिनीयर यांच्या उपस्थितीत ख्रिश्चन पद्धतीने व  दुसऱ्या दिवशी हिंदु पद्धतीत लग्न पार पडले. निक जोनासचे संपूर्ण कुटुंब यावेळी हजर होते. निकचे आप्त स्वकिय, भाऊ केविन आणि त्याची पत्नी डॅनियल, गेम ऑफ थ्रोन्सचे कलाकार सोफी टर्नर आणि फ्रँकी जोनास यांची विवाहाला हजर होते. प्रियंकाच्या बाजून तिचे सर्व मित्र आणि कुटुंबिय उपस्थितीत होते.पाश्चिमात्य पद्धतीचे कपडे परिधान करुन त्यांनी ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला. राल्फ लॉरेन्स याने डिझाईन केलेले कपडे त्यांनी परिधान केले होते. भारतीय डिझायनर सब्यासाची यांनी हिंदू पद्धतीच्या लग्नाचे कपडे डिझाईन केले होते. यात निक सिल्कच्या शेरवानीमध्ये शोभून दिसला.

Web Title: Priyanka Chopra-Nick Jonas Wedding cake is too big