प्रियांका चोप्रा-निक जोनसनं लेकीसह घेतलं देवाचं दर्शन; मालती मेरीनं जिंकलं नेटकऱ्यांचं मन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 02:28 PM2024-01-18T14:28:19+5:302024-01-18T14:31:56+5:30

मालती मेरीनं आपल्या क्यूटनेस नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे. 

Priyanka Chopra-Nick Jonas Sought Blessings at Temple and celebrated their daughter Malti's second birthday | प्रियांका चोप्रा-निक जोनसनं लेकीसह घेतलं देवाचं दर्शन; मालती मेरीनं जिंकलं नेटकऱ्यांचं मन

प्रियांका चोप्रा-निक जोनसनं लेकीसह घेतलं देवाचं दर्शन; मालती मेरीनं जिंकलं नेटकऱ्यांचं मन

'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची लाडाची लेक मालती मेरी ही दोन वर्षांची झाली आहे. आपल्या लाडक्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त प्रियांका आणि निकने मंदिरात देवाचं दर्शन घेतलं. याचे काही फोटो प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमधील छोट्याश्या मालती मेरीनं मात्र आपल्या क्यूटनेस नेटकऱ्यांचं मन जिंकलं आहे. 

मालती मेरीच्या वाढदिवशी प्रियंका संपूर्ण कुटुंबासह मंदिरात पोहचली.  विशेष पूजेत प्रियंका चोप्राची आई मधु चोप्रा यांनीही सहभाग घेतला होता. प्रियंका चोप्राने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मधु चोप्रा, निक जोनास, प्रियांका चोप्रा आणि मालती मेरी पाहायला मिळत आहेत.  एका फोटोत मालतीच्या गळ्यात एक मोठा हार घातलेला दिसत आहे. सातासमुद्रापार गेली असली तरी प्रियांका हिंदू संस्कृती विसरलेली नाही, अशा कमेंट चाहत्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.

प्रियंका आणि निकने मालतीचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासोबत साजरा केला. बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मालतीसाठी खास एल्मो थीमचा केक तयार करण्यात आला होता. यावेळी मालतीने गुलाबी रंगाचा टॉप, लाल रंगाची पँट आणि हार्टच्या आकारचा गॉगल घातला. या लूकमध्ये मालती खूपच क्युट दिसली.  2 वर्षांच्या मालतीचा स्वॅग पाहून तिचं कौतुक करताना चाहते थकत नाही आहेत. 

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनासचा जन्म 15 जानेवारी 2022 रोजी झाला होता. मालती आणि मेरी ही प्रियांकाची आई डॉ मधु चोप्रा आणि निकची आई डेनिस यांच्या आईंची नावे आहेत. यामधून प्रियंका आणि निकने अनोखा आदर्श सगळ्यांसमोर ठेवला आहे. तर  प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी 2 डिसेंबर 2018 रोजी जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाला देश-विदेशातून अनेक पाहुणे आले होते.
 

Web Title: Priyanka Chopra-Nick Jonas Sought Blessings at Temple and celebrated their daughter Malti's second birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.