प्रियांका चोप्रा घेऊन येतेय ‘Bumble’ डेटींग अ‍ॅप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 12:53 IST2018-10-04T12:51:40+5:302018-10-04T12:53:55+5:30

बॉलिवूड ते हॉलिवूड आणि अ‍ॅक्टिंग ते प्रोड्यूसरपर्यंतचा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता एक नवी इनिंग सुरू करतेय. 

Priyanka Chopra to launch dating app Bumble in India | प्रियांका चोप्रा घेऊन येतेय ‘Bumble’ डेटींग अ‍ॅप!!

प्रियांका चोप्रा घेऊन येतेय ‘Bumble’ डेटींग अ‍ॅप!!

बॉलिवूड ते हॉलिवूड आणि अ‍ॅक्टिंग ते प्रोड्यूसरपर्यंतचा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता एक नवी इनिंग सुरू करतेय. होय, आता प्रियांका इन्व्हेस्टर अर्थात गुंतवणूकदार बनली आहे. प्रियांकाने अलीकडे दोन टेक स्टार्सअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. यातील पहिली कंपनी आहे सॅन फ्रांसिस्कोची टेक स्टार्टअप कंपनी होल्बर्टन कंपनी. ही एक कोडिंग एज्युकेशन कंपनी आहे. तर दुसऱ्या कंपनीचे नाव ‘बंबल’ आहे. ‘बंबल’ ही एक डेटींग अ‍ॅप  असून या वर्षांच्या अखेरपर्यंत ‘बंबल’ भारतात पाय पसरण्याच्या तयारीत आहे. दुस-या शब्दात सांगायचे तर या कंपनीसोबत मिळून प्रियांका भारतात ‘बंबल’ ही डेटींग अ‍ॅप सुरू करणार आहे.


‘बंबल’ भारतात लॉन्च होत आहे. महिलांना एक सुरक्षित डेटींग अ‍ॅप देणे, हा यामागचा उद्देश असल्याचे प्रियांकाने म्हटले आहे. महिलांसाठी इन्व्हेस्टमेंट, सोशल ट्रान्सफॉर्मेशन आणि आणि त्यांची इकॉनॉमिक ग्रोथ गरजेची आहे, असे मी मानते. महिलांना प्रेम हवे आहे. तिला मैत्री हवी आहे. तिला करिअर हवे आहे. ‘बंबल’ हेच करते. माझ्यासाठी हा नवा चॅप्टर आहे. दोन टेक स्पेस कंपन्यांसोबत जुळून मला आनंद होतोय, असे प्रियांकाने म्हटले आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासने साधारण दोन महिन्यांपूर्वी साखरपुडा केला आहे, त्यानंतर सध्या दोघांच्या लग्नाची चर्चा जोरात सुरु आहे. अजूनपर्यंत दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही.

Web Title: Priyanka Chopra to launch dating app Bumble in India