​प्रियांका चोप्राने झी सिने पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स सादर करण्यासाठी घेतले तब्बल इतके पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 11:31 IST2017-12-20T06:01:02+5:302017-12-20T11:31:02+5:30

झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला सलमान खान, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा यांसारख्या सिताऱ्यांनी हजेरी ...

Priyanka Chopra has taken so much money in the Zee Cine Award ceremony to present her performance | ​प्रियांका चोप्राने झी सिने पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स सादर करण्यासाठी घेतले तब्बल इतके पैसे

​प्रियांका चोप्राने झी सिने पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स सादर करण्यासाठी घेतले तब्बल इतके पैसे

सिने पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला सलमान खान, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा यांसारख्या सिताऱ्यांनी हजेरी लावली होती. प्रियांकाने या पुरस्कार सोहळ्याला केवळ हजेरी लावली नाही तर परफॉर्मन्स देखील सादर केला. सध्या प्रियांका हॉलिवूडमध्ये व्यग्र असल्याने ती बॉलिवूडच्या पुरस्कार सोहळ्यांना, पार्टींना खूपच कमी हजेरी लावते. पण प्रियांकाने झी सिने पुरस्काराला हजेरी लावल्याने तिच्या फॅन्ससाठी झी सिने पुरस्कार खास ठरणार आहे. या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी प्रियांकाने किती कोटी रुपये घेतले ते ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. प्रियांकाने पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी तब्बल पाच कोटी घेतले असे म्हटले जाते. शाहरुख खान, सलमान खान यांसारखे सितारे नेहमीच पुरस्कार सोहळ्यांसाठी १० ते १२ कोटी घेत असतात. पण सलमान आणि शाहरुखच्या तुलनेत प्रियांकाने बॉलिवूडमध्ये एंट्री करून खूपच कमी वर्षं झाली आहेत. पण तिने कमी वर्षांत बॉलिवूडमध्ये केलेली प्रगती ही कौतुकास्पद आहे. 

priyanka chopra

झी सिने पुरस्कार सोहळ्यात प्रियांकाने गुलाबी रंगाचा वनपीस घातला होता. या वनपीसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. प्रियांकाचा जलवा प्रेक्षकांना रेड कार्पेडवर पाहायला मिळाला. प्रियांका चोप्रा रेड कार्पेटवर मजा मस्ती करताना दिसली. श्रीदेवी आणि बोनी कपूरसोबत हसत खेळत गप्पा मारतानाचा तिचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तसेच एका फोटोमध्ये ती सौफी चौधरीसोबत गप्पा मारताना दिसत आहे. प्रियांकाने या पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स देखील सादर केला. तिच्या या परफॉर्मन्सला उपस्थितांनी टाळ्या वाजवत दाद दिली. प्रियांका चोप्राने रणवीर सिंग आणि अनिल कपूर यांच्यासोबत दिल धडकने दो या चित्रपटात काम केले होते. त्यांच्यासोबत देखील ती मजा मस्ती करताना दिसली. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अक्षय कुमार एका वेगळ्याच लूकमध्ये दिसला. अक्षयने केस एकदम छोटे केसे असून दाढी वाढवली आहे. तसेच आलिया भट्ट, जॅकलिन फर्नांडिस, करण जोहर, भूमी पेडणेकर यांनी स्टायलिश अंदाजात या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. 

Also Read : ​काय म्हणता, प्रियांका चोप्राची जागा दीपिका पादुकोणने घेतली?
 

Web Title: Priyanka Chopra has taken so much money in the Zee Cine Award ceremony to present her performance