प्रियांका चोप्राच्या ‘पार्टी’त होणार मोठी घोषणा? निक आणि त्याचे कुटुंब येणार??

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 21:22 IST2018-08-12T21:17:47+5:302018-08-12T21:22:59+5:30

प्रियांका चोप्रा आणि तिचा अमेरिकन बॉयफ्रेन्ड निक जोनास यांच्या लग्नाच्या बातम्यांना पुन्हा जोर चढला आहे. याचे कारण आहे, मुंबईत होऊ घातलेली एक पार्टी. 

Priyanka Chopra Grand Party In Mumbai | प्रियांका चोप्राच्या ‘पार्टी’त होणार मोठी घोषणा? निक आणि त्याचे कुटुंब येणार??

प्रियांका चोप्राच्या ‘पार्टी’त होणार मोठी घोषणा? निक आणि त्याचे कुटुंब येणार??

प्रियांका चोप्रा आणि तिचा अमेरिकन बॉयफ्रेन्ड निक जोनास यांच्या लग्नाच्या बातम्यांना पुन्हा जोर चढला आहे. याचे कारण आहे, मुंबईत होऊ घातलेली एक पार्टी. होय, येत्या १८ आॅगस्टला प्रियांकाने मुंबईत एक ग्रॅण्ड पार्टी ठेवली आहे. या पार्टीत प्रियांकाचा बॉयफ्रेन्ड निक आणि त्याचे अख्खे कुटुंब सामील होऊ शकते. याच पार्टीत प्रियांका व निकच्या लग्नाच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून निक आणि प्रियांका यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा आहेत. पण अद्याप प्रियांका व निक या दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे हे मान्य केलेले नाही. दोघांचा साखरपुडा झाल्याचेही मानले जात आहे. पण प्रियांका वा निक याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत.
डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाने तिचे जवळचे मित्र आणि नातेवाईकांना १८ आॅगस्टच्या पार्टीचे निमंत्रण दिले आहे. ही पार्टी मुंबईत होणार आहे. पण मुंबईत कुठे, म्हणजे पार्टी वेन्यू काय असेल, हे अद्यापही कळलेले नाही.
प्रियांका व निक येत्या १६ सप्टेंबरला लग्न करणार असे मानले जात आहे. कारण या दिवशी निकचा वाढदिवस असतो. अर्थात ही सुद्धा गॉसिप्सच्या दुनियेतून आलेली एक बातमी आहे. खरे काय, ते प्रियांकाने सांगितल्यानंतर आपल्याला कळणार आहे आणि त्यामुळे तिच्या ग्रॅण्ड पार्टीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
 

 


ढ१्र८ंल्ल‘ं उँङ्मस्र१ं ॠ१ंल्ल िढं१३८ कल्ल ट४ेुं्र येणार

Web Title: Priyanka Chopra Grand Party In Mumbai