प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या चाहत्यांसाठी खुशखबर, घरात लवकरच होणार चिमुकल्याचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 17:45 IST2020-05-15T17:44:02+5:302020-05-15T17:45:26+5:30

सोशल मीडियाद्वारे प्रियंका आणि निकवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Priyanka Chopra Is Going To Be A 'Chachi' As 'Jethani', Sophie Turner Was Spotted With A Baby Bump PSC | प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या चाहत्यांसाठी खुशखबर, घरात लवकरच होणार चिमुकल्याचे आगमन

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या चाहत्यांसाठी खुशखबर, घरात लवकरच होणार चिमुकल्याचे आगमन

ठळक मुद्देनिकचा भाऊ जो जोनसची पत्नी सोफी टर्नर ही गरोदर असून त्यांचे कुटुंबीय सध्या चांगलेच खूश आहे. सोफी आणि जोला नुकतेच बाहेर फिरताना पाहण्यात आले, त्यावेळी सोफीचे बेबी बम्प दिसून आले.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्याचे आगमन होणार आहे. निकचा भाऊ जो जोनसची पत्नी सोफी टर्नर ही गरोदर असून त्यांचे कुटुंबीय सध्या चांगलेच खूश आहे. सोफी आणि जोला नुकतेच बाहेर फिरताना पाहण्यात आले, त्यावेळी सोफीचे बेबी बम्प दिसून आले. सध्या कोरोनने सगळीकडे थैमान घातले असल्याने जो आणि सोफी दोघांनी त्याावेळी मास्क घातला होता. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यांचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. तसेच प्रियंका आणि निकवर देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सोफी गरोदर असल्याची बातमी तिने काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्याना दिली होती. सोफीचा पती जो जोनास हा प्रसिद्ध पॉप सिंगर आहे तर  ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सोफीने गेम्स ऑफ थ्रोन्स या प्रसिद्ध मालिकेत काम केले आहे. त्या दोघांनी ऑक्टोबर 2017 मध्ये साखरपुडा केला होत. त्यानंतर काहीच महिन्यांनंतर जूनमध्ये लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला जोनास कुटुंबियांतील सगळ्यांनी हजेरी लावली होती. 

जो जोनास आणि सोफी 2016 पासून नात्यात असून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या या नव्या चिमुकल्यामुळे ते सध्या चांगलेच खूश आहेत. प्रियंका आणि सोफी यांच्यात खूप चांगले नातं असून प्रियंकाच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला दोघींचे अनेक फोटो पाहायला मिळतात. 

Web Title: Priyanka Chopra Is Going To Be A 'Chachi' As 'Jethani', Sophie Turner Was Spotted With A Baby Bump PSC