प्रियांका चोप्रा या कारणामुळे पडली निक जोनासच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 20:06 IST2018-10-30T20:05:48+5:302018-10-30T20:06:14+5:30

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने लाइफ पार्टनर म्हणून निक जोनासची निवड का केली याचे उत्तर दिले आहे. सध्या तिची लग्नाची तयारी सुरु असून डिसेंबरमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

Priyanka Chopra fell in love with Nick Jonas | प्रियांका चोप्रा या कारणामुळे पडली निक जोनासच्या प्रेमात

प्रियांका चोप्रा या कारणामुळे पडली निक जोनासच्या प्रेमात

ठळक मुद्देप्रियांका चोप्रा व निक जोनास लवकरच अडकणार विवाहबंधनात


बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियांका चोप्रा अमेरिकन गायक निक जोनाससोबत लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. बऱ्याच काळापासून त्यांच्या नात्याच्या चर्चा सुरू होत्या. काही महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला. आता डिसेंबर महिन्यात जोधपूर येथे त्यांचा ग्रॅण्ड विवाहसोहळा पार पडणार आहे.

नुकतेच प्रियांकाचे 'प्री वेडींग्स ब्रायडल शॉवर'चाही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान एका माध्यमाशी बोलताना प्रियाकांने तिची लव्हस्टोरी सांगितली आहे. तसेच जोडीदाराची निवड करताना महिलांनी कोणत्या गोष्टींचा विचार करावा याच्या टीप्सही तिने यावेळी दिल्या आहेत. यावेळी ती म्हणाली, 'निक बद्दल सांगायचे तर तो सर्वांचा खूप आदर करतो. आपल्या कामाचाही आदर करतो. त्याच्यासमोर जर महत्वाच्या कामाचे २ पर्याय असतील, तर तो त्यापैकी तुमचे जे मत असेल, ते काम तो करतो आणि त्याची हीच गोष्ट मला फार आवडते.'
पुढे प्रियांका म्हणाली की, 'आपल्या नात्यात एकमेकांप्रती विश्वास आणि समजूतदारपणा असेल, तर ते नाते बहरते. नात्यातला विश्वासच आपले नाते टिकवण्यास मदत करतो. जो व्यक्ती तुमचा आदर करेल अशाच व्यक्तीची निवड आपण केली पाहिजे. याचा अर्थ त्याने कॉफीचा आयता कप तुमच्या समोर ठेवला पाहिजे, असा होत नाही. तुम्ही आयुष्यात एखाद्याच्या गोष्टींवर खूप मेहनत घेता त्या मेहनतीचा त्याने आदर केला पाहिजे. ती व्यक्ती या सर्व गोष्टींचा आदर करत असेल तरच त्याची निवड करा. माझ्याबाबतीत म्हणायचे तर मी अशाच पद्धतीने विचार करते.

Web Title: Priyanka Chopra fell in love with Nick Jonas