वाइन पिऊन शूटिंग करणे प्रियांका चोप्राला पडले महागात!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 22:08 IST2018-04-27T16:38:24+5:302018-04-27T22:08:30+5:30
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘क्वांटिको’च्या तिसºया सीजनची शूटिंग करताना जखमी झाली आहे. प्रियांकाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. प्रियांकाने शुक्रवारी अमेरिकी ...

वाइन पिऊन शूटिंग करणे प्रियांका चोप्राला पडले महागात!!
अ िनेत्री प्रियांका चोप्रा ‘क्वांटिको’च्या तिसºया सीजनची शूटिंग करताना जखमी झाली आहे. प्रियांकाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. प्रियांकाने शुक्रवारी अमेरिकी शो ‘क्वांटिको’विषयी आपल्या चाहत्यांशी काही गोष्टी शेअर केल्या. प्रियांकाने ट्विट करून लिहिले की, ‘शूटिंगदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली आहे. माझ्यासोबत सेटवर एक फिजिओलॉजिस्ट आहे. माझ्या गुडघ्याची दुखापत पुढील तीन आठवड्यानंतर ठीक होणार आहे. त्यानंतर एलेक्स क्वांटिकोमध्ये परतणार आहे. यावेळी प्रियांकाने याबाबतचाही खुलासा केला की, ‘इटली येथे शूटिंगदरम्यान मी आणि माझ्या क्रू सदस्यांनी जरा जास्तच टस्कन वाइन घेतली होती.’
प्रियांकाने म्हटले की, ‘इटलीमध्ये शूटिंगदरम्यान मुख्य कलाकारांपैकी मी एकटीच होती. त्यामुळे क्रूबरोबर रात्री उशिरा बाहेर गेली होती. तेथे आम्ही टस्कन वाइन जास्तच घेतली. त्यामुळेच माझा अपघात झाला. दरम्यान, प्रियांका यातून लवकर बरी होऊन सेटवर परतावी अशीच तिच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. ‘क्वांटिको’ या मालिकेचे निर्माता जोशुओ सफ्रान आहेत. मालिकेत प्रियांका एलेक्स पॅरिशची भूमिका साकारत असून, ती एफबीआयसाठी काम करीत असते.
दरम्यान, प्रियांका तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टबरोबर बॉलिवूडमध्येही लवकरच परतणार आहे. सूत्रानुसार, ती सलमान खानच्या आगामी ‘भारत’मध्ये झळकणार आहे. त्याचबरोबर ती इतरही प्रोजेक्टवर काम करीत आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, प्रियांकाचा ‘क्वांटिको’ हा अखेरचा शो असणार आहे. पुढच्या भागापासून ती या शोचा भाग बनणार नाही. बॉलिवूड चित्रपटांत काम करता येत नसल्यानेच प्रियांकाने हा निर्णय घेतला आहे.

}}}} ">I actually hurt my knee filming this! I had to have a physiologist on set with me and my knee wrapped for the next 3 weeks #AlexIsBack#Quantico@QuanticoTV— PRIYANKA (@priyankachopra) April 27, 2018
I actually hurt my knee filming this! I had to have a physiologist on set with me and my knee wrapped for the next 3 weeks #AlexIsBack#Quantico@QuanticoTV— PRIYANKA (@priyankachopra) April 27, 2018