‘भारत’नंतर प्रियांकाचा हाती लागला आणखी एक धमाकेदार प्रोजेक्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 11:40 IST2018-07-17T11:40:00+5:302018-07-17T11:40:33+5:30

वेबसीरिजला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून अनेक बडे स्टार्सही या नव्या माध्यमाच्या प्रेमात पडू लागले आहेत. होय, हॉलिवूड गाजवणारी प्रियांका चोप्रा हिला सुद्धा हा मोह आवरता आलेला नाही.

priyanka chopra to debut in a web series | ‘भारत’नंतर प्रियांकाचा हाती लागला आणखी एक धमाकेदार प्रोजेक्ट!

‘भारत’नंतर प्रियांकाचा हाती लागला आणखी एक धमाकेदार प्रोजेक्ट!

सध्या सगळीकडे वेबसीरिजचा बोलबाला आहे. अनेक बोल्ड विषयांवरच्या वेबसीरिज गाजत आहेत. सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची ‘सेक्रेड गेम्स’ ही वेबसीरिज याचे ताजे उदाहरण. या व अशा वेबसीरिजला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून अनेक बडे स्टार्सही या नव्या माध्यमाच्या प्रेमात पडू लागले आहेत. होय, हॉलिवूड गाजवणारी प्रियांका चोप्रा हिला सुद्धा हा मोह आवरता आलेला नाही. ताजी बातमी मानाल तर लवकरचं प्रियांका एका वेबसीरिजमध्ये झळकणार आहे.
डिएनएने याबाबतचे वृत्त दिले आहे. ‘क्वांटिका’ या इंटरनॅशनल वेबसीरिजने प्रियांकाला हॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. केवळ ओळखचं नाही तर या वेबसीरिजने इंटरनॅशन स्टार अशी एक नवी ओळख प्रियांकाला मिळाली. याच सीरिजच्या धर्तीवर प्रियांकाला अनेक आॅफर्स मिळत आहेत. अशाच एका फिक्शन सीरिजसंदर्भात अमेरिकेच्याच एका नावाजलेल्या प्रॉडक्शन हाऊससोबत प्रियांकाची चर्चा सुरू आहे. ही फिक्शन सीरिज जगातील सर्वांत मोठ्या आॅनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.
बॉलिवूडमध्ये प्रियांकाने दोन सिनेमे साईन केले आहेत. यापैकी एक म्हणजे ‘भारत’ आणि दुसरा म्हणजे ‘दी स्काय इज पिंक’. लवकरच प्रियांका ‘भारत’ या बॉलिवूडपटाचे शूटींग सुरु करणार आहे. यात ती सलमान खानसोबत दिसेल. ‘स्काय इज पिंक’. सोनीली बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर लीड भूमिकेत आहेत. अभिनेत्री जायरा वसीमही यात दिसणार आहे. प्रियांका यात जायराच्या आईची भूमिका साकारणार आहे.

Web Title: priyanka chopra to debut in a web series