ढसाढसा रडू लागली प्रियंका आणि म्हणाली, मला माफ करा, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 11:40 IST2019-09-18T11:36:37+5:302019-09-18T11:40:29+5:30

बॉलिवूडची देसीगर्ल प्रियंका चोप्रा चांगलीच चर्चेत आहे. सध्या ती द स्काय इज पिंक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सिनेमाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

Priyanka Chopra cried in emotional scene of the sky is pink revealed director shonali bose | ढसाढसा रडू लागली प्रियंका आणि म्हणाली, मला माफ करा, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक

ढसाढसा रडू लागली प्रियंका आणि म्हणाली, मला माफ करा, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक

बॉलिवूडची देसीगर्ल प्रियंका चोप्रा चांगलीच चर्चेत आहे. सध्या ती द स्काय इज पिंक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.  सिनेमाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ती ऐकून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, त्याचे झाले असे की द स्काय इज पिंक सिनेमामधील एक सीन शूट करताना प्रियंका अचानक ढसा-ढसा रडू लागली. सीन शूट झाल्यानंतर ही प्रियंका बराचवेळ रडत होती.


रिपोर्टनुसार  सिनेमाची दिग्दर्शक सोनाली बोस म्हणाली, ''द स्काय इज पिंकच्या एका सीनचे शूटिंग करताना प्रियंका खूप इमोशनल झाली. ती ढसाढसा रडू लागली. सीन शूट झाल्यानंतरही प्रियंकाचे अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. प्रियंका म्हणत होती मला माफ करा.. मला माफ करा. आता मला कळले एक आईला आपल्या मुलाला गमावण्याचे काय दु:ख असते. मला इशानला घेऊन खूप दु:ख होतेय आणि मी प्रियंकाला संभाळण्याचा प्रयत्न करत होते.''  

इशान हा दिग्दर्शिका सोनाली बोस यांचा मुलगा होता. इशानचा वयाच्या 16 व्या वर्षी करंट लागून मृत्यू झाला. सोनाली बोस यांचा हा सिनेमा एका सत्यकथेवर आधारित आहे. अदिती आणि नरेन चौधरी आपली मुलगी आयेशा चौधरी जिला एक गंभीर आजार आहे.

सिनेमात मुलीचा आजार आणि माता-पित्याचा संघर्ष दाखवला जाणार आहे. प्रियंकासोबत चित्रपटात फरहान अख्तर, जायरा वसीम आणि रोहित सराफ मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट मोटिवेशनल स्पीकर आयेशा चौधरीच्या आयुष्यावर आधारित आहे. सहा महिन्यांच्या वयात बोन मॅरो ट्रांसप्लांटचा सामना करणाºया आयेशाला काही काळानंतर साइड-इफेक्टमुळे पल्मोनरी फायबरोसिस सारखा घातक आजार झाला होता. केवळ 19 वर्षांच्या वयात तिचा मृत्यु झाला होता.
 

Web Title: Priyanka Chopra cried in emotional scene of the sky is pink revealed director shonali bose