"लग्नासाठी मुलीची व्हर्जिनिटी पाहू नका तर...", 'त्या' वक्तव्यावर प्रियांका चोप्राचं स्पष्टीकरण, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:36 IST2025-06-26T17:35:22+5:302025-06-26T17:36:00+5:30

"लग्नासाठी व्हर्जिन मुलगी पाहू नका. व्हर्जिनिटी एका दिवसात संपते", असं वक्तव्य प्रियांका चोप्राने केल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत होत्या. त्यावर आता अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट पाहून प्रियांकाचा पारा चढला आहे.

priyanka chopra clarification on viral statement dont look for virgin wife said its not me | "लग्नासाठी मुलीची व्हर्जिनिटी पाहू नका तर...", 'त्या' वक्तव्यावर प्रियांका चोप्राचं स्पष्टीकरण, म्हणाली...

"लग्नासाठी मुलीची व्हर्जिनिटी पाहू नका तर...", 'त्या' वक्तव्यावर प्रियांका चोप्राचं स्पष्टीकरण, म्हणाली...

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने केलेल्या एका वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. "लग्नासाठी व्हर्जिन मुलगी पाहू नका. व्हर्जिनिटी एका दिवसात संपते", असं वक्तव्य प्रियांका चोप्राने केल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत होत्या. त्यावर आता अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट पाहून प्रियांकाचा पारा चढला आहे. 

प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने यामागचं सत्य सांगितलं आहे. "ही मी नाही. हे मी बोललेले नाही आणि हा माझा आवाजही नाही. ऑनलाइन याच्या पोस्ट फिरत आहेत, म्हणजे ते खरंच असेल असं नाही. फेक कंटेट बनवून प्रसिद्धी मिळवणं हा आजकाल सोपा मार्ग झाला आहे. या पोस्टसोबत दिलेल्या लिंक किंवा कुठल्याही ऑनलाइन पोस्टसोबत दिलेल्या लिंक या खऱ्या नाहीत. प्रत्येक ऑनलाइन पोस्टवर विश्वास ठेऊ नका आणि गोष्टी तपासून पाहा", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये काय? 

"लग्नासाठी व्हर्जिन मुलगी पाहू नका तर मॅनर्स असलेली मुलगी पाहा. व्हर्जिनिटी एका दिवसात संपते. पण मॅनर्स नाही", असं वक्तव्य प्रियांकाने केल्याच्या पोस्ट फिरत होत्या. अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत असं वक्तव्य केल्याचंही पोस्टमध्ये म्हटलं गेलं होतं. पण, आता मात्र या सगळ्या पोस्ट खोट्या असून मी असं वक्तव्य केलं नसल्याचं प्रियांकाने स्पष्ट केलं आहे. 

Web Title: priyanka chopra clarification on viral statement dont look for virgin wife said its not me