'एक मुलगी अन् तिचा गणपती' प्रियंका चोप्राने शेअर केले लेकीचे क्युट Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 11:26 IST2023-09-20T11:24:18+5:302023-09-20T11:26:20+5:30

प्रियंकाने अमेरिकेतील घरीच गणेश चतुर्थी साजरी केली.

priyanka chopra celebrates ganesh chaturthi with daughter malti mary in los angeles shared cute photos | 'एक मुलगी अन् तिचा गणपती' प्रियंका चोप्राने शेअर केले लेकीचे क्युट Photos

'एक मुलगी अन् तिचा गणपती' प्रियंका चोप्राने शेअर केले लेकीचे क्युट Photos

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा माहोल आहे. भाविकांनी जल्लोषात बाप्पाचं स्वागत केलंय. बाप्पाची आरती, सजावट, नैवेद्य, प्रसाद, ढोलताशाचा गजर अशा उत्साहात गणेशोत्सव साजरा होतोय. तर भारताबाहेर राहणारेही नागरिकही आपापल्या परीने गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रानेही (Priyanka Chopra) युएसमधील तिच्या घरी देवघरात बाप्पाची छोटी मूर्ती स्थापन केली. यावेळी प्रियांकाची लेक मालती मेरीने (Malti Mary) सर्वांचंच लक्ष वेधलं.

प्रियंकाने अमेरिकेतील घरीच गणेश चतुर्थी साजरी केली. तिने शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देवघरात तिने छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती बसवली आहे. तर बाजूला एक गणपतीचं एक सॉफ्ट टॉय आहे. मालती मेरीचं हे लाडकं खेळणं दिसतंय कारण ती त्यालाच कवटाळून बसली आहे. तसंच प्रियंकाने मालतीला अगदी पारंपारिक पद्धतीने तयार केलं आहे. कपाळावर टिकली आणि हातात बांगड्या अशा गेटअपमध्ये ती खूपच क्यूट दिसतेय. प्रियंकाने फोटोंना कॅप्शन देत लिहिले, 'एक मुलगी आणि तिचा गणपती. जिथे जाऊ तिथे आमच्यासोबत असतो.'

निक जोनासने या फोटोंवर हार्ट इमोजी कमेंट केली आहे. प्रियंका भारताबाहेर असली तरी लेकीला ती भारतीय संस्कार देत आहे हे पाहून चाहत्यांनाही आनंद झालाय. प्रियंकाही जमेल तसं अमेरिकेत भारतीय सण साजरा करत असते. काही महिन्यांपूर्वी तिने पती निक जोनाससोबत होळी साजरी केली होती. 

प्रियंका चोप्राची चुलत बहीण परिणीती चोप्रा या महिनाअखेरीस लग्नबंधनात अडकत आहे. मावशीच्या लग्नात मालती मेरी आईबाबांसोबत येऊ शकते. याआधी ती परिणीतीच्या साखरपुड्याला आली होती. ती मालती मेरीची भारतात येण्याची पहिलीच वेळ होती.

Web Title: priyanka chopra celebrates ganesh chaturthi with daughter malti mary in los angeles shared cute photos