ख्रिसमसच्या तयारीला लागली प्रियंका चोप्रा, पती आणि लेकीसोबत जंगी सेलिब्रेशन करणार देसी गर्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 14:46 IST2023-12-12T14:43:52+5:302023-12-12T14:46:49+5:30

प्रियंका चोप्रा तिच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ख्रिसमस सेलिब्रेशनच्या तयारीची झलक दाखवली आहे.

priyanka chopra busy christmas celebration preparation at la home actress shares photo | ख्रिसमसच्या तयारीला लागली प्रियंका चोप्रा, पती आणि लेकीसोबत जंगी सेलिब्रेशन करणार देसी गर्ल

ख्रिसमसच्या तयारीला लागली प्रियंका चोप्रा, पती आणि लेकीसोबत जंगी सेलिब्रेशन करणार देसी गर्ल

प्रियंका चोप्रा ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. पण तिने हिंदी चित्रपटांपासून सुरु झालेल्या आपला प्रवास हॉलिवूडपर्यंत नेला आहे. आज ती एक ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. 2002 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या प्रियंकाने तामिळ सिनेमातून आपला प्रवास सुरू केला. प्रियंका चोप्रा नेहमी स्वत:शी संबंधित अपडेट्स शेअर करत असते. सध्या प्रियंका चोप्रा ख्रिसमसच्या तयारीत बिझी असल्याचे दिसतंय.  प्रियंकाने ख्रिसमसच्या तयारीची झलक दाखवली आहे. 

प्रियंका चोप्रा तिच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ख्रिसमस सेलिब्रेशनच्या तयारीची झलक दाखवली आहे. प्रियंकाने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिच्या लॉस एंजेलिसच्या घरातील फायरप्लेस कॉर्नरला लाईट्स, बाउबल्स, हॉली आणि आयव्हीने सजवलेले दिसतेय. प्रियांका चोप्राने या फोटोसोबत लिहिले आहे, 'ग्रेटफुल'. प्रियंका चोप्राची तयारी पाहता ती ख्रिसमस मोठ्या थाटात सेलिब्रेट करणार असल्याचे दिसते. प्रियंका आणि निक जोनासचे लेक मालती मेरीसोबत हे दुसरं ख्रिसमस सेलिब्रेशन आहे. प्रियांका चोप्रा प्रत्येक सण मोठ्या थाटामाटात आपल्या कुटुंबासोबत साजरा करते.

प्रियंका चोप्राच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची वेब सीरिज 'सिटाडेल' मध्ये दिसली होती. देसीगर्लकडे बॉलिवूड आणि हॉलिवूडचे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. 

Web Title: priyanka chopra busy christmas celebration preparation at la home actress shares photo