प्रियांकाचे नखरे, भन्साली बिचारे
By Admin | Updated: June 3, 2016 01:39 IST2016-06-03T01:39:26+5:302016-06-03T01:39:26+5:30
हॉलीवूडमध्ये आपला अभिनय आणि अदांनी धूम केल्यानंतर देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या भारतात परतलीय. ४० दिवसांसाठी पिग्गी चॉप्स भारतात असून, आपल्या पुढच्या सिनेमाची घोषणा करणार आहे

प्रियांकाचे नखरे, भन्साली बिचारे
हॉलीवूडमध्ये आपला अभिनय आणि अदांनी धूम केल्यानंतर देसी गर्ल प्रियांका चोप्रा सध्या भारतात परतलीय. ४० दिवसांसाठी पिग्गी चॉप्स भारतात असून, आपल्या पुढच्या सिनेमाची घोषणा करणार आहे. मात्र, बी-टाउनची ही पिंकी पैसेवालों की आहे की काय, अशा चर्चा बी-टाउनमध्ये रंगल्या आहेत. कारण आपले गुरू समजणाऱ्या संजय लीला भन्साली यांनाच प्रियांकाने रखडवून ठेवलेय. बाजीराव मस्तानीच्या यशानंतर प्रियांकाने आगामी पद्मावती सिनेमात काम करावे, अशी भन्सालींची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी सिनेमाची स्क्रिप्ट प्रियांकाच्या घरी नेऊन ठेवलीय. मात्र, प्रियांकाचा भाव असा काही वधारलाय की, भारतात येऊन आठवडा उलटला, तरी तिने ती स्क्रिप्ट वाचलेली नाही. पिग्गी चॉप्सने भन्सालींशी संपर्क केलेला नाही.