शाहरुख खान OUT होताच प्रियंका चोप्रा झाली In, रणवीर सिंगसोबत 'डॉन ३'मध्ये लागली वर्णी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 11:26 AM2023-11-07T11:26:45+5:302023-11-07T11:29:31+5:30

प्रियंकाने 'डॉन 3'मध्ये काम करण्यासाठी होकार दिल्याचं बोललं जात आहे.

Priyanka chopra as female ead in don 3 starring ranveer singh says report | शाहरुख खान OUT होताच प्रियंका चोप्रा झाली In, रणवीर सिंगसोबत 'डॉन ३'मध्ये लागली वर्णी?

शाहरुख खान OUT होताच प्रियंका चोप्रा झाली In, रणवीर सिंगसोबत 'डॉन ३'मध्ये लागली वर्णी?

फरहान अख्तर(Farhan Akhtar)ने 'डॉन ३' (Don 3) चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. टीझरमध्ये 'डॉन'ची ओळख करून देण्यात आली आहे. यासोबतच त्याने 'डॉन'च्या सिक्वेलमध्ये शाहरुख खान(Shah Rukh Khan)च्या जागी रणवीर सिंगची भूमिका घेतल्याची पुष्टी केली आहे. त्याचवेळी अशीही बातमी येत आहे की, 'डॉन 3'मध्ये प्रियंका चोप्राची एंट्री होऊ शकते. प्रियांका 'डॉन' फ्रेंचायझीच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांचा भाग होती.

'कोईमोई'च्या रिपोर्टनुसार, 'जी ले जरा'चे कास्टिंग अजून झालेले नाही, फरहान अख्तर 'डॉन 3' कडे सध्या लक्षकेंद्रीत करतो  आहे. तो लवकरच प्रियंका चोप्रा आणि रणवीर सिंगसोबत 'डॉन 3' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. रिपोर्टनुसार, प्रियंकाने नुकतीच फरहान अख्तरची भेट घेतली आणि त्यांनी 'डॉन 3' बद्दल चर्चा केली.

प्रियंकाने 'डॉन 3'मध्ये काम करण्यासाठी होकार दिल्याचं बोललं जात आहे. फक्त याची अधिकृत घोषणा बाकी आहे. या चित्रपटासाठी यापूर्वी कियारा अडवाणी आणि क्रिती सेनॉनला अप्रोच करण्यात आले होते. मात्र कोणाचेही नाव निश्चित झाले नाही. आता 'डॉन 3'चे शूटिंग कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही, मात्र प्रियंका चोप्राचे नाव फायनल असल्याचे मानले जात आहे.

प्रियंका चोप्राने यापूर्वी रणवीरसोबत 'गुंडे', 'बाजीराव मस्तानी' आणि 'दिल धडकने दो'मध्ये काम केले होते. रणवीर सिंग सध्या 'सिंघम अगेन'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, तर प्रियंका चोप्रा तिच्या काही आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टचं काम पूर्ण करून 'डॉन 3'च्या शूटिंगला सुरुवात करु शकते. 

Web Title: Priyanka chopra as female ead in don 3 starring ranveer singh says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.