जगातील ‘या’ सर्वाधिक सुंदर व महागड्या शहरात होणार प्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 13:46 IST2018-08-22T13:45:16+5:302018-08-22T13:46:09+5:30

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांचा ‘रोका’ झाला आणि आता या कपलच्या लग्नाची चर्चा सुरू झालीयं. 

Priyanka Chopra and Nick Jonas will get married in Hawaii | जगातील ‘या’ सर्वाधिक सुंदर व महागड्या शहरात होणार प्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न!!

जगातील ‘या’ सर्वाधिक सुंदर व महागड्या शहरात होणार प्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न!!

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांचा ‘रोका’ झाला आणि आता या कपलच्या लग्नाची चर्चा सुरू झालीयं. ‘रोका’ झाल्यानंतर निक लगेच अमेरिकेला परतला. इकडे प्रियांका आपल्या बॉलिवूड चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी झाली. पण इतक्या बिझी शेड्यूलमध्येही दोघांनीही जमेल तसे लग्नाचे प्लानिंग सुरू केले आहे. आयुष्यातला लग्नाचा दिवस सर्वार्थाने खास असावा, अशी दोघांचीही इच्छा आहे. साहजिकचं लग्नाच्या स्थळापासून, लग्नाच्या निमंत्रणपत्रिकांपर्यंत सगळे काही खास करण्यावर त्यांचा भर आहे. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांका व निक दोघेही हवाईमध्ये लग्न करू शकतात. प्रियाका व निक दोघांनाही मीडिया आणि गर्दीपासून दूर एक खासगी सोहळा हवा आहे. त्यामुळे निसर्गसंपन्न समुद्राच्या कुशीत वसलेल्या हवाईला दोघांनीही पसंती दिली आहे. निकला समुद्र प्रचंड आवडतो. त्यामुळे याचठिकाणी हे जोडपे लग्नगाठ बांधेल, याची शक्यता अधिक आहे. हे लग्न कसे होईल, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. पण हा सोहळा पारंपारिक हिंदू पद्धतीने होईल, असे मानले जात आहे.

 काल-परवा प्रियांकाच्या आईने याबाबतचे संकेत दिले होते. मी प्रियांकावर माझे विचार लादू इच्छित नाही. पण तिचे लग्न पारंपरिक पद्धतीने व्हावे, अशी माझी इच्छा आहे. पूजा आणि रोका झालाच. आता लग्नही अशाच पद्धतीने व्हावे, असे मला वाटते. माझ्यासाठी पारंपरिक लग्नविधी महत्त्वाचे आहेत, असे प्रियांकाची आई मधू चोप्रा म्हणाल्या होत्या. प्रियांकाच्या आईची ही इच्छा बघता प्रियांका व निक भारतीय हिंदू पद्धतीने लग्न करतील, असे मानले जात आहे. यासाठी हवाई सारख्या महागड्या शहराची निवड केली जात असेल तर हे लग्न अतिशय शाही लग्न असेल, यात शंकाचं नाही. अद्याप लग्नाची तारीख मात्र ठरलेली नाही.

Web Title: Priyanka Chopra and Nick Jonas will get married in Hawaii