बॉलिवूडच्या केवळ या एका व्यक्तिला मिळाले प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या पार्टीचे निमंत्रण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 18:23 IST2018-08-17T18:22:47+5:302018-08-17T18:23:16+5:30

 ताज्या बातमीनुसार, उद्या शनिवारी प्रियांका व निक अधिकृतपणे एन्गेज्ड होणार आहेत. प्रियांकाच्या कुटुंबाने उद्या एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले आहे.

priyanka chopra and nick jonas party bollywood producer ronnie screwvala is the only person who got the invite | बॉलिवूडच्या केवळ या एका व्यक्तिला मिळाले प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या पार्टीचे निमंत्रण?

बॉलिवूडच्या केवळ या एका व्यक्तिला मिळाले प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या पार्टीचे निमंत्रण?

प्रियांका चोप्रा हॉलिवूडमधून परतलीयं. पण तरिही कायम चर्चेत आहे. अमेरिकन सिंगर निक जोनाससोबतचे अफेअर आणि यानंतर साखरपुड्याच्या बातम्यांमुळे प्रियांकाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ताज्या बातमीनुसार, उद्या शनिवारी प्रियांका व निक अधिकृतपणे एन्गेज्ड होणार आहेत. प्रियांकाच्या कुटुंबाने उद्या एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले आहे आणि या ग्रॅण्ड पार्टीत प्रियांका व निकचा ‘रोका’ होईल. निकचे मॉम डॅडही या पार्टीत सहभागी होणार आहेत. काल रात्री उशीरा निक आपल्या कुटुंबासोबत भारतात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्याची पार्टी खास निक आणि प्रियांकाच्या कुटुंबीयांसाठी आयोजित केली गेली आहे. त्यामुळे यात बॉलिवूड सेलिब्रिटी नसतील़ केवळ कुटुंबाचे सदस्यचं या पार्टीत सामील होतील. बॉलिवूडच्या बड्या-बड्या स्टार्सलाही या पार्टीचे निमंत्रण दिले गेलेले नाही.

 या पार्टीत खूप कमी लोक असावेत, अशी प्रियांकाची इच्छा होती. तिच्या इच्छेनुसार, पार्टीचे आयोजन करण्यात आले आहेत. बॉलिवूडची केवळ एकमेव व्यक्ती या पार्टीत असणार आहे. ती म्हणजे, निर्माते रॉनी स्क्रूवाला. आता या बातमीत किती सत्यता आहे, ते तर उद्या समजेलच. तोपर्यंत अर्थातचं प्रतीक्षा...

गेल्या अनेक दिवसांपासून निक आणि प्रियांका यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा आहेत. पण अद्याप प्रियांका व निक या दोघांपैकी कुणीही अधिकृतपणे हे मान्य केलेले नाही. दोघांचा साखरपुडा झाल्याचेही मानले जात आहे. पण प्रियांका वा निक याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत.

 

Web Title: priyanka chopra and nick jonas party bollywood producer ronnie screwvala is the only person who got the invite