अमेरिकन आणि भारतीय दोन्ही पद्धतीने होणार प्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 20:50 IST2018-10-01T20:49:27+5:302018-10-01T20:50:21+5:30

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा साखरपुडा आणि रोका झालाय. आता दोघांचेही कुटुंब लग्नाच्या तयारीत गुंतले आहेत. ताज्या माहितीनुसार, जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रियांका व निकचा विवाह सोहळा होणार आहे.

priyanka chopra and nick jonas marriage mixed culture of america and india | अमेरिकन आणि भारतीय दोन्ही पद्धतीने होणार प्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न?

अमेरिकन आणि भारतीय दोन्ही पद्धतीने होणार प्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न?

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा साखरपुडा आणि रोका झालाय. आता दोघांचेही कुटुंब लग्नाच्या तयारीत गुंतले आहेत. ताज्या माहितीनुसार, जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत प्रियांका व निकचा विवाह सोहळा होणार आहे. प्रियांकाने या लग्नाची प्लानिंगही सुरू केली आहे. प्रियांका व निक दोघेही आपले लग्न यादगार बनवू इच्छितात. त्यामुळेच दोघींनीही आपआपल्या रितीरिवाजानुसार लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय आणि अमेरिकन अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे. आता हे लग्न किती ग्रँण्ड होईल, याची कल्पनाचं न केलेली बरी. प्रियांका व निक दोघेही हवाईमध्ये लग्न करू शकतात. प्रियाका व निक दोघांनाही मीडिया आणि गर्दीपासून दूर एक खासगी सोहळा हवा आहे. त्यामुळे निसर्गसंपन्न समुद्राच्या कुशीत वसलेल्या हवाईला दोघांनीही पसंती दिली आहे. निकला समुद्र प्रचंड आवडतो. त्यामुळे याचठिकाणी हे जोडपे लग्नगाठ बांधेल, याची शक्यता अधिक आहे. अद्याप लग्नाची तारीख मात्र ठरलेली नाही.

सध्या निक भारतात आहे. प्रियांका तिच्या ‘स्काय इज पिंक’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी असल्याने सध्या तिचा मुक्काम भारतात आहे. प्रियांकाला भेटण्यासाठी निकही भारतात आला आहे. कालच निक बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींसोबत फुटबॉल मॅचचा आनंद घेताना दिसला.

 

Web Title: priyanka chopra and nick jonas marriage mixed culture of america and india